ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात सुमारे ४० कुटुंबियांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा.बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रम काढावे अशी दवंडी व नोटीस यापूर्वी सा.बां.विभागाच्यावतीने झोपडी मालकांना बजावला होता; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्त्वात सा.बा.विभागाची चमु जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचली. सुरूवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तुम्हाला न.प.ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथे तूम्ही जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत व पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारपर्यंत सुमारे २५ झोपड्या सा.बा.विभागाच्या अधिकाºयांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.टायर जाळून केला कारवाईचा निषेधबजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डापुलावर बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी एकत्र येत टायर व कापूस जाळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईचा निषेध केला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जळत असलेला टायर व कापूस विजवून तो रस्त्याच्या कडेला केला. शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.स्मशानभूमीलगतची जागा पंतप्रधान आवास योजनेसाठीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी वर्धा न.प.ने ठराव घेतला असल्याचे नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर मोहिमेला ब्रेकअतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे या मुद्द्यावर होकार दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.तर पाच दिवसानंतर पुन्हा मोहीम राबविणारजिल्हाधिकाºयांच्या सुचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली. येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास सा. बा. विभागातर्फे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपुल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
झोपड्यांवर चालला बांधकामचा गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:29 PM
येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम : आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे रूंदीकरण प्रकरण