शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:22 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला.बजाज चौकातील भाजी बाजारात वाढत्या अतिक्रमणामुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची अनेक तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी रस्त्याच्या मधोमध अतिक्रमण करून भाजी विक्री करणाºयांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, सचिव समीर पेंडके, प्रकाश पाटील, बोकडे, बंडेवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अतिक्रमण मोहीम राबविताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांची चमू तैनाद करण्यात आली होती.रस्ता झाला होता अरुंदवर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्यारीत येणाºया बजाज चौक येथील भाजी बाजारात काही भाजी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी येणाºयांना साधी पायी वाट काढताना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. शिवाय रस्ता अरुंद झाला होता. त्याबाबतच्या तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कार्लेकर यांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण