शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:01 PM

बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली.

ठळक मुद्देबुटीबोरी-तुळजापूर मार्ग : अनेकांची घरे जमीनदोस्त, रस्त्याच्या बांधकामाला मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली.बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. रस्ता बांधकामात अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने सेलडोह येथील जवळपास ३० ते ४० जणांची घरे पाडण्यात आली. यातील काहींनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. यातील काहींची घरे शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी २ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. यात पंचायत समिती सभापतींचेही घर पाडण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केसरीचंद खंगार यांच्या रोपवाटिकेतील कित्येक वर्षे जुनी झाडे पाडण्यात आली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई कोण देणार? असा त्यांचा सवाल आहे. अनेक वर्षांपासून डौलाने उभ्या असलेली निवासस्थाने भुईसपाट झाल्याने रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम करण्यासाठी आड येत असलेल्या घराच्या मोबदल्याची संपूर्ण रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग झाली आहे. केवळ घर पाडण्यासाठी व त्यातील साहित्य इतर ठिकाणी कामी येऊ शकत होते, ते काढण्यासाठी संबंधितांना सहा महिन्यांची मुभा देण्यात आली होती. मात्र, याकडे अनेकांनी कानाडोळा केला. अखेर शुक्रवारी शिल्लक राहिलेली घरे जेसीबी मशीन लावून पाडण्यास कंपनीने सुरुवात केलीे. नागरिकांची याबाबत कोणतीही तक्रार नाही. मात्र, शिल्लक राहिलेला व महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे भूखंडांचा फेरफार न झाल्यामुळे जमिनीचा मोबदला न्यायालयीन लढाईत अडकला असल्याने तो केव्हा मिळणार, याकडे पीडितांचे लक्ष लागले आहे. जागेचा योग्य मोबदला लवकर मिळाल्यास स्थायी स्वरूपात हक्काच्या घराची उभारणी करून वास्तव्यास जाऊ, असे पीडित बोलत आहेत. शेषराव सोनटक्के यांना तीन सर्र्व्हे नंबरपैकी दोन सर्व्हे नंबरमधील मोबदला मिळाला आहे. एका सर्व्हे नंबरचा मोबदला मिळाला नसतानाही घर पाडण्यात आले. त्यामुळे मोबदला कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार प्रल्हाद काटकर, सिंदीचे ठाणेदार हेमंत चांदेकर, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकरे, तलाठी मानकर व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.सालोड (हिरापूर) मध्येही कारवाईबुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सालोड (हिरापूर) येथेही करण्यात आली. सकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी महसूल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौपदीकरणाच्या आड येणारे अतिक्रमन हटविण्यात आले. नागरिकांनीही याला सहकार्य केल्याने रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला.