लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथील जळीत कांडाने राज्यातील नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या अंगावर शहारा ंआणला. या घटनेसह दिवसेंदिवस वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमधील क्रूर मानसिकतेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महिला हिंसाचार विरोधी सामूहिक उपवास, आत्मचिंतन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार पूर्णवेळ सहभागी झाले होते. सदर आंदोलनादरम्यान हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवाय ‘गांधी-गांधी कहने वालो; गांधी का कुछ कार्य करो’ यासह एकापेक्षा एक भजन सादर करून प्रबोधन करण्यात आले.महिला हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदर क्रूर मानसिकतेचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून गांधीगिरीचा अवलंब करून करण्यात आला. शिवाय पालकमंत्र्यांसह विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी एक दिवसीय उपवास करून आत्मचिंतन केले. सकाळी ८ वाजता रामधूनने या आंदोलनाची सुरूवात झाली. त्यापूर्वी पालकमंत्री सुनील केदार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. जसजसा सूर्य डोक्यावर येत मावळतीला गेला तसतशी आंदोलन मंडपात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीसह विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.गांधीगिरीचा अवलंब करून करण्यात आलेल्या या आंदोलनात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जि.प. अध्यक्ष सरीता गाखरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता टोकस, माजी आमदार अमर काळे, प्रा. राजू तिमांडे, शेखर शेंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, नई तालिमचे माजी मंत्री अनिल फरसोले, जि.प. सदस्य सुकेशीनी धनवीज, भिमोदय समितीचे अध्यक्ष निरंजन ब्राह्मणे, श्रीकांत बाराहाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, संजय इंगळे तिगावकर, शिवसेनेचे समीर देशमुख, राकाँ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शरयू वांदिले, माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ, पंढरी कापसे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, जि.प. सदस्य संजय शिंदे, धैर्यशील जगपात, भंते नागित बोधी, माजी सभापती कुंदा भोयर, लॉयन्सच्या प्रतिभा ठाकूर, शिवसेनेचे तुषार देवढे, माजी नगराध्यक्षा सुनीता इथापे, सलीम कुरेशी, विशाल चौधरी, पुरुषोत्तम टोणपे, विजय नरांजे, अॅड. पुजा जाधव, सुमंत मानकर, विनोद पांडे, पद्मा तायडे, भाष्कर इथापे, शारदा झामरे, अभ्युदय मेघे, अनिल रॉय, जन स्वराज्य संघटनेचे राजू बाराहाते, सुनील कोल्हे, प्रविण पेठे, नागपूर बहूजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार, राकेश मंशानी, राजेश गावंडे, शारदा केने, रवी शेंडे, विना दाते, सुरेश ठाकरे आदी सहभागी झाले होते.मानसिकता बदलणे गरजेचे : सुनील केदारकेवळ कठोर कायदा करून हा प्रश्न निकाली निघणारा नाही. प्रत्येकाच्या डोक्यातील भेदभाव दूर झाला पाहिजे. क्रूर मानसिकता ही मानव समाजासाठी हानीकारक असून समाजातील प्रत्येक स्तरातून मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न होणे गरजचे आहे, असे याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्ध्यात पालकमंत्री सुनील केदार म्हणाले.भजनातून समाजप्रबोधनमहिला हिंसाचार विरोधी सामुहिक उपवास व आत्मचिंतनादरम्यान दत्ता राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक भजन सादर करून समाजप्रबोधन केले. दत्ता राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या सरस भजनामुळे उपस्थित भारावून गेले होते. डॉ. आंबेडकर चौकातील या आंदोलनाची सुरूवात रामधूनने झाली.
‘गांधी-गांधी कहनेवालो- गांधी का कुछ कार्य करो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM
महिला हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदर क्रूर मानसिकतेचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून गांधीगिरीचा अवलंब करून करण्यात आला. शिवाय पालकमंत्र्यांसह विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी एक दिवसीय उपवास करून आत्मचिंतन केले. सकाळी ८ वाजता रामधूनने या आंदोलनाची सुरूवात झाली. त्यापूर्वी पालकमंत्री सुनील केदार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.
ठळक मुद्देमहिला हिंसाचाराविरोधात आत्मचिंतन आणि उपवास