लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.स्थानिक सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ही गांधी विचार यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजतापासूनच महात्मा गांधी पुतळा परिसरात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी तेथे एकच गर्दी केली होती. दुपारी २.४० वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, इतवारा चौक, मुख्य बाजारपेठ, सोशालिस्ट चौक, वंजारी चौक मार्गक्रमण करीत स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचली. तेथे पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. गांधी विचार यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूतमाला अर्पण करून केले राष्ट्रपित्याला अभिवादनखा. राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी २.४० वाजताच्या सुमारास दाखल झाला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून खाली उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूणार्कृती पुतळ्याला दुपारी २.४६ वाजताच्या सुमारास सूतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली.कार्यकर्त्यांशी केले हस्तांदोलनसेवाग्राम येथून वर्धा शहारातील सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास आले. त्यांनी आपल्या वाहनातून उतरताच सुरूवातीला नागरिकांच्या गर्दीत जात काही नागरिकांशी हस्तांदोलन केले. शिवाय हात हालवून यात्रेत सहभागी होणाºया नागरिकांचे अभिवादन केले.पोलिसांची झाली दमछाककाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी हे अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती पैकी एक आहेत. ते विविध कार्यक्रमानिमित्त सेवाग्राम व वर्धेत येत असल्याने कार्यक्रम स्थळी मंगळवारी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. सिव्हील लाईन भागातून गांधी विचार यात्रा काढण्यात आली. तेथेही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे एकत्र झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश; काँग्रेसची गांधी विचार यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:07 PM
. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.
ठळक मुद्देराहुल गांधींनी केले नेतृत्त्व