लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गांधी-विनोबांच्या नावाने पोळी शेकणाºया राजकारण्यांनी आजपावेतो या जिल्ह्यासाठी काही केले नाही. यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही. या लोकसभा मतदार संघात दहा हजार कोटींच्या खर्चातून सेवाग्राम विकास आराखडा, रस्त्यांचे चौपदरीकरण व इतर कामे हाती घेत चालना दिली जात आहे. रावणामध्ये असलेला अहंकार व दुष्ट प्रवृत्ती त्याच्या नाशासाठी कारणीभूत ठरली; पण या बाबींचा पाठपुरावा न करता जे चांगले असेल ते करण्यासाठी प्रयत्न राहिले आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.स्थानिक मिरणनाथ मंदिर प्रांगणात आयोजित विजयादशमी कार्यक्रमात ते बोलत होते. अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, तहसीलदार तेजस्विनी जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, न.प. सदस्य नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, अब्दुल नईम, सारिका लाकडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. तडस यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उंच आकाशात उडणाºया फटाक्यांमुळे परिसर प्रकाशमान होऊन सर्वांचे लक्ष वेधले गेले. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दसरा उत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संचालन ताराचंद गुजरकर यांनी केले.
गांधी-विनोबांचा जिल्हा आजपावेतो उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:50 PM
गांधी-विनोबांच्या नावाने पोळी शेकणाºया राजकारण्यांनी आजपावेतो या जिल्ह्यासाठी काही केले नाही. यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही.
ठळक मुद्देरामदास तडस : विजयादशमी कार्यक्रमात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन