लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यातील विविध कामांना प्रारंभ झाला आहे. या कामांच्या प्रारंभीच दोन गांधी विचाराने चालणाºया संस्था आमने-सामने आल्यात. या संस्थांचा वाद पोलिसांत पोहोचला असून पोलीस सावधगिरी बाळगून आहे.सबंध विश्वाला शांंती आणि अहिंसेचे धडे देणाºया महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या संस्थांतील या वादामुळे कामांना खिळ बसण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती येत्या २०१९ मध्ये साजरी करण्यात येत आहे. या काळात सेवाग्राम विकास आराखड्याचे कामही होणार आहे. यात एका मोठ्या गांधी चित्रप्रदर्शनीचे नियोजन आहे. हे प्रदर्शन होत असलेली जागा मगन संग्रहालयाच्या ताब्यात आहे. यामुळे मगन संग्रहालय संस्थेच्यावतीने पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. आश्रम प्रतिष्ठानने दिलेल्या जागेवर गांधी चित्रप्रदर्शनी, बाजार, निवास -स्थाने व पार्किंग आदी कामे होत आहे. मगन संग्रहालयाने उपस्थित केलेल्या या वादावर मात करण्याकरिता आश्रम प्रतिष्ठानद्वारे पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आले. पत्रात ही जागा मोकळी करण्याची मागणी केली. यामुळे अहिंसेचा संदेश देणाºया शांतीदुताचे विचार त्यांच्याच नावे चालणाºया संस्था पायदळी तुडवित आहे. विकास आराखड्यात गांधी चित्रप्रदर्शनीचा समावेश असल्याने मगन संग्रहालय समितीची अडचण झाली. पर्यायी जागा देण्याची मागणी पूढे करण्यात आली आणि गांधीजींच्या संस्थांमध्ये वाद निर्माण झाला.गांधी विचारांच्या प्रचारापेक्षा उद्योगावरच भरमहाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठानच्या जागेवर चित्रप्रदर्शनी निर्माण करून ती प्रतिष्ठानला दिली. प्रतिष्ठानने मगन संग्रहालयाला चालवायला दिली; पण गांधी चित्रप्रदर्शनीला कापड भंडार, ग्रामोद्योग, पुस्तक भंडार व प्राकृतिक आहार केंद्राने छेद दिला. नेमकी हीच बाब सेवाग्राम आश्रम व गांधीवाद्यांना पटेनाशी झाली. मगन संग्रहालयाने गांधी चित्रप्रदर्शनीपेक्षा व्यवसायाला महत्त्व दिल्याने तत्वानांच हरताळ फासला आहे.मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. यामुळे भूमिका कळली नाही.सेवाग्राम विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा झाली. त्यावेळी मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता उपस्थित होत्या. त्यांनी तीन महिन्यांची मुदत मागून गांधी चित्रप्रदर्शनी खाली करून देण्याची ग्वाही दिली होती; पण अद्याप प्रदर्शनी खाली केली नाही. यामुळे विकास आराखड्याच्या कामाला खिळ बसली आहे.- जयवंत मठकर, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. संस्थेकडे जागा असून गांधी चित्रप्रदर्शनीमध्ये कार्यरत ३० स्त्री-पुरूष असून ३०० बचत गटांचे साहित्य या ठिकाणावरून विकले जात आहे. सर्व कर्मचारी स्थानिक असल्याने विचार व्हावा.- भावना डगवार, व्यावसायिक, गांधी चित्रप्रदर्शनी, सेवाग्राम.
चित्र प्रदर्शनावरून गांधीवादी संस्था आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:24 AM
सेवाग्राम विकास आराखड्यातील विविध कामांना प्रारंभ झाला आहे. या कामांच्या प्रारंभीच दोन गांधी विचाराने चालणाºया संस्था आमने-सामने आल्यात.
ठळक मुद्देमगन संग्रहालय समितीकडून पर्यायी जागेची मागणी : जागा रिकामी करण्याकरिता पोलीस अधीक्षकांना पत्र