शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

गांधीवादी संस्था लढवय्यांचे किल्ले झाल्या पाहिजेत

By admin | Published: December 27, 2014 2:16 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मांध, प्रतिगाम्यांची संघटना असून असत्याची मांडणी करणे, हा त्यांच्या तंत्राचा भाग आहे, ...

वर्धा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मांध, प्रतिगाम्यांची संघटना असून असत्याची मांडणी करणे, हा त्यांच्या तंत्राचा भाग आहे, अशी नोंद ६० वर्षापूर्वीच आचार्य विनोबा भावे यांनी केली आहे़ आज देशात उद्यमांची सत्ता आली आहे़ अशावेळी, गांधीवादी संस्था केवळ चष्मा आणि चपलाजोडेच सांभाळणार की गांधीविचारही समाजात पोचविणार, असा परखड सवाल उपस्थित करीत गांधीवादी संस्था आता लढवय्यांचे किल्ले झाल्या पाहिजेत, असे आवाहन चरित्रकार आणि सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी केले. यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि भोळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बजाज सार्वोजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या समारोहात रायगड जिल्ह्यातील विजय दिवाण यांना ‘आचार्य विनोबा भावे’ या चरित्रगं्रथासाठी डॉ़ भा़ल़ भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार देण्यात आला़, तर पुणे येथील प्रगतीशील भारतीय मुस्लीम आंदोलनातील कार्यकर्ते अन्वर राजन यांना डॉ़ भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ़ यशवंत सुमंत तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा़ डॉ़ चित्तरंजन मिश्र, विजया भोळे, संस्थाध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा़ शेख हाशम उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा़ शेख हाशम यांनी केले़ मानपत्रांचे वाचन प्रा़ राजेंद्र मुंढे यांनी केले़ संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले़ यशस्वीतेसाठी रंजना दाते, हिरण्मय भोळे, प्रा़ पद्माकर बावीस्कर, प्रशांत पनवेलकर, डॉ़ स्मिता वानखेडे, आकाश दाते आदींनी सहकार्य केले़(शहर प्रतिनिधी)