लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींचे विचार केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी मार्गदीप ठरणारे आहे. गांधीजींनी सांगितलेला शिक्षणविषयक विचार हा वंचित, शोषित माणसाच्या सर्वंकष कल्याणाचा आहे, असे विचार आमदार अमर काळे यांनी व्यक्त केले.दीपस्तंभ मित्र परिवारातर्फे सलग पाचव्या वर्षी सावित्रीआई फुले स्मृती व्याख्यान आणि सन्मान समारंभाचे मंगळवारी मातोश्री सभागृहात आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांना गांधीजींनी प्रथम महात्मा या नावाने संबोधले. भारतात जर सर्वांत मोठा पुतळा उभारावयाचा असेल, तर तो महात्मा फुले यांचाच असला पाहिजे, एवढे मोठे कार्य बहुजनांच्या शिक्षणासाठी आणि अस्मितेसाठी महात्मा फुले यांनी केले. त्या महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या नावाने दीपस्तंभ मित्र परिवाराने सुरू केलेली व्याख्यानमाला अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार सर्वोदयी रमेशभाई ओझा यांनी मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे होते. त्यांनी गांधीजींच्या शिक्षणविषयक आणि अंत्योदय विषयावर विचार व्यक्त केले.व्याख्यानमालेप्रसंगी सेवाग्राम येथील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांचा महात्मा गांधी समाजसेवी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांनी शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाची आवश्यकता विशद केली. तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधाकरिता आवश्यक जनजागृतीची भूमिका मांडली. मिळालेला सन्मान हा सहकारी विद्यार्थ्यांचा असल्याचे ते म्हणाले. दीपस्तंभचे मार्गदर्शक, स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक पुनसे आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.याप्रसंगी आर्वी तालुक्यातील सालफळ येथील शिक्षक संजय शेळके, कुंडी (कारंजा) येथील शिक्षक हेमंत पर्बत यांचा महात्मा फुले शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भौतिक सुविधांसाठी मदत करणाऱ्या दानदात्यांना राजर्षी शाहू महाराज शाळास्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पुरुषोत्तम टोणपे, महाकाळ, दीपक पिंपरीकर, वर्धा, पवन ठाकरे नागझरी, संदीप लांबट धानोली, प्रशांत नेपटे आर्वी, वर्धा मोबाईल असोसिएशनचे महेंद्र खडसे यांच्यासह वर्धा नगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक ज्ञानेश्वर पिसे, नीलेश गुल्हाणे, पद्मश्री मेघे, गणेश पांढरे, सुषमा नागपुरे, वैशाली वाटकर, अनिल टोणपे आदींचा समावेश आहे.प्रास्ताविक परिवाराचे संयोजक विजय कोंबे यांनी तर संचालन श्रीकांत अहेरराव यांनी केले. चंद्रशेखर ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
गांधींचे शिक्षणविषयक विचार विश्वासाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:13 PM
महात्मा गांधींचे विचार केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी मार्गदीप ठरणारे आहे. गांधीजींनी सांगितलेला शिक्षणविषयक विचार हा वंचित, शोषित माणसाच्या सर्वंकष कल्याणाचा आहे, असे विचार आमदार अमर काळे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देअमर काळे : इंद्रजित खांडेकरांसह महानुभवांचा सन्मान, दीपस्तंभ मित्र परिवाराचे आयोजन