लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले.वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षणमंत्र्यांचा महत्वाकांक्षी असा 'शिक्षणाची वारी' उपक्रम राबवला जात आहे. परंतु, ज्या स्थळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते स्थळ महात्मा गांधीच्या नावाने प्रसिद्ध आहे. गांधींजींचे महात्म्य सांगणारा जगातील सगळ्यात मोठा चरखा या परिसरात आहे. मात्र, कार्यक्रमात कोठेही गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता. त्यामुळे गांधींच्याच भूमीत गांधीजींचा विसर पडलेला पहायला मिळाले.शासनाच्या वतीने १५० व्या गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ध्यातसुद्धा शिक्षणाची वारी नावाने शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम राबिवला जात आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.मात्र, कार्यक्रम पत्रिकेवर उपक्रम स्थळाचा पत्ता लिहिताना 'हुतात्मा स्मारकासमोरील मैदान' असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर कार्यक्रम स्थळी किंवा दिपप्रज्वलन स्थळी गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता.या प्रकारामुळे आयोजकांवर टीका होत आहे. सोशल मिडियावरही याबाबत चर्चा रंगली आहे.शिक्षणाच्या वारीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. आज अनेक शाळांना शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, शासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब मनाला खटकणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी यावेळी व्यक्त केले.गांधीजींच्या विचारांनी प्रभावित सेवाग्राम आश्रम परिसरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्य स्तरीय शिक्षण प्रदर्शन 3/4/5/6 जानेवारी 2019 ला आयोजित केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या परिसरात व व्यासपीठावर राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री व अन्य भाजप नेत्यांची मोठमोठी फोटो बैनर/फ्लैक्स दिसत आहे. पण गांधीजींचा एक तरी फोटो किमान मंचावर, गेटवर, परिसरात लावण्याचे सौजन्य या लोकांना दाखवता आलेलं नाही हे विशेष आहे.गांधीजींची १५० वी जयंतीचा कार्यक्रम करत असलेल्या शासन- प्रशासनाला महात्मा गांधीजींच्या जागेवर गांधीजींचाच विसर पडला , यावरून या भाजपा प्रणित लोकांच्या ओठात एक आणि पोटात एक हे सहज लक्षात येते.अविनाश काकडे,शेतकरी नेते