ठळक मुद्देसुमारे ३०० कलाकृतींचा संग्रह
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: खडू व पेन्सिलमध्ये सुबक गणेशमूर्ती कोरण्याचा छंद असलेल्या प्रफुल्ल साखरकर या तरुणाने आपल्या प्रतिभेने अनेकांना भुरळ घातली आहे. लहानपणापासूनच त्याला खडूमध्ये कोरीव काम करण्याचा छंद होता. त्याने खडू व पेन्सिलीमध्ये विठ्ठल-रुख्माईसह अनेक आकर्षक कलाकृती तयार केलेल्या आहेत. त्याच्याजवळ अशा सुमारे ३०० हून अधिक कलाकृती आहेत. एखादी कलाकृती पूर्ण करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याचे त्याने सांगितले. त्याचे वडील व मोठा भाऊ शिक्षक आहेत. त्या
च्या कलाकृतींचे समाजात कौतुक केले जात आहे.