Ganesh Chaturthi 2018; वर्ध्यातील सावंगीत आरोग्यदायी गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:23 PM2018-09-18T14:23:26+5:302018-09-18T14:25:12+5:30
सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया या काळात करण्यात येतात. आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ही सारी आरोग्य सेवा पुरविली जाते. या काळात अस्थीरोग, बालरोग, मेडीसिन, स्त्री रोग व प्रसुती, त्वचारोग, श्वसन रोग, कान,नाक, घास, नेत्र व मानसोपचार अशा ८० शिबीरांचे आठ दिवस आयोजन केले जाते. याशिवाय विविध रोगांवर कार्यशाळा आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. विशेष म्हणजे बहुतांशी आरोग्य सेवा या विनामुल्य दिल्या जातात. तर काही तपासण्या व शस्त्रक्रिया माफक सेवा शुल्क घेतले जाते.
गणेशोत्सवाच्या काळात सावंगी येथे विविध आरोग्य शिबीर राबविली जातात. दररोज हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार दिले जातो. या संपूर्ण काळात आपण स्वत: सावंगी (मेघे) येथे उपस्थित राहत असतो.
दत्ता मेघे, कुलपती तथा माजी खासदार, वर्धा