Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:19 AM2018-09-13T11:19:43+5:302018-09-13T11:20:07+5:30

पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले.

Ganesh Chaturthi 2018; Wardha district; 125 Years Old Ganesha Temple in Nanchangwa | Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

Next
ठळक मुद्देकपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने आठ जीन सुरू होते. याच मंडळींनी १८९० मध्ये चार एकर जागेत गणेश व शितला माता मंदिराचे बांधकाम केले.
तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पं.मदनलाल शर्मा कार्यरत होते. १ मे २०१३ मध्ये पं. कमलनयन यांचा मृत्यू झाल्याने वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं. दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत. या ठिकाणी पूर्वीचे गणेश मंदिर आजही त्याच स्थितीत आहे. महाराजदिन यांनी त्या काळी पिंपळ वृक्षाखाली देवीची स्थापना केली. आज तेथे छोटेखानी शितला माता मंदिर आहे व लागूनच गणेश मंदिर आहे. धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा या भावनेतून गणेश जिनींग व प्रेसींग तर १८८१ मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाला. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला. हे दोन्ही देवी देवता जागृत मानल्या जाते. आजही मार्बलची सुंदर गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होवून नगररचना करण्यात आली. १९१० मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदिमुळे शहरातील अनेक उद्योग बंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. १९५५-५६ मध्ये मालगुजारी संपली आणि २२ नोव्हेंबर १९९५ रोजी गणेश व शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मदाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. ११ वर्षे न्यायालयीन प्रकरण सुरू होते. २८ नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली, पण न्यायालयीन खर्च, उत्पन्न स्त्रोंताचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होवू शकला नाही. इंग्रज राजवटीत १८९३ पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरीक आजही नवरात्र गणेशोत्सव आदी कार्यक्रमांतून या मंदिराच्या प्रांगणात उत्सव साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, १२५ वर्षांचा इतिहास, भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा व विकास निधी देणे गरजेचे आहे.

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Wardha district; 125 Years Old Ganesha Temple in Nanchangwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.