वर्धा : गांजाची विक्री करणाऱ्या अनिकेत उर्फ सोनू अशोक दंढारे (२७) रा. सेलू याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २१ रोजी रात्री रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सेलू येथे एका हॉटेल परिसरात करण्यात आली. पोलिसांनी ६३ हजार १५० रुपयांच्या ६ किलो ३१५ ग्रॅम गांजासह मोबाईल व रोख १,१०० रुपये तसेच कार असा एकूण ५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सेलू पोलिसात गुन्हा दाखल केला.
पोलिस गस्तीवर असताना त्यांना आरोपी अनिकेत दंढारे हा गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी द ग्रेट अशोका हॉटेल परिसरात नाकाबंदी केली असता आरोपी सोनू हा एम.एच. ०४ ई.डी. ९०३९ क्रमांकाच्या कारमध्ये बसून गांजा विक्री करताना दिसला. पोलिसांनी त्यास अटक करुन गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, मनीष कांबळे, पवन पन्नासे, रामकिसन इप्पर, प्रदीप वाघ यांनी केली.