शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

झुडपी जमिनीवर वनविभाग साकारणार उद्यान

By admin | Published: August 23, 2016 2:05 AM

येथील वनविभाग कार्यालयाच्या सभोवताल असलेल्या शासकीय झुडपी आणि पडिक जमिनीवर

कारंजा (घाडगे) : येथील वनविभाग कार्यालयाच्या सभोवताल असलेल्या शासकीय झुडपी आणि पडिक जमिनीवर ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर यांनी दिली. या कामाचा शुभारंभ म्हणून या जागेला तारांची संरक्षक भिंत तयार करून १ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कारंजा वनकार्यालयाचे सभोवताल शासकीय वनविभागाची सर्व्हे नं. १९४ मध्ये ५.३३ हेक्टर पडीक व झुडपी जमीन आहे. आतापर्यंत या शासकीय जागेवर काहींनी अतिक्रमण करून जागेचा गैरवापर होता. वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांनी जिल्हा वनधिकारी पगार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडीक जमीन ताब्यात घेवून सौदर्यीकरण करून ज्येष्ठ नागरिक व बालकासाठी सुशोभित उद्यान निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व जमिनीच्या सभोवताल ताराचे कपाऊंड घालून जमीन ताब्यात घेण्यात आली. जवळपास ७५ वन कर्मचाऱ्यांनी स्वत: मेहनत घेवून खोलगट चर तयार केलेत. या चरावर करंज आणि ब्लोसेडीया या जातीचे १ हजार ५०० झाडे लावली. चराच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात टेकडीवरील पाणी उतरून साचणार आणि लावलेल्या झाडांना निसर्गत: पाणी मिळणार अशी व्यवस्था या कर्मचाऱ्यांनी केली. याच परिसरात इतर शोभेची झाडे, मुलांसाठी खेळाचे साहित्य, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करून उद्यान निर्माण केले जाणार आहे. कारंजा शहरात इतरत्र कुठेही उद्यान नसल्यामुळे निश्चितच या उद्यानाला आगळे वेगळे महत्त्व येणार अशी चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)