१९९३९ विद्यार्थी : शालेय पोषण आहारसुरेंद्र डाफ आर्वीइयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शिजविण्यास्तव गॅस सिलिंडर देण्यात येत आहे. यात तालुक्यातील केवळ तीनच शाळांना गॅस जोडणी असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंतचे शालेय पोषण आहाराचे एकूण १२ हजार ९२१ लाभार्थी आहेत. यात इयत्ता पहिली ते पाचवी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी विद्यार्थी ७ हजार १८ तर इयत्ता सहावी ते आठवीचे शालेय पोषण आहाराचे ५ हजार ९०३ विद्यार्थी आहेत. शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व वेळेत पोषण आहार मिळावा म्हणून तालुक्यातील सर्व शाळांना गॅस जोडणीबाबतची माहिती मागविली. आर्वी तालुक्यात पहिली ते आठवीच्या १८७ शाळा असून सर्व शाळांत विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहर पुरविला जातो. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सुविधा नसलेल्या तालुक्यातील सर्व शाळांची माहिती शिक्षण विभाग वर्धा यांनी आर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागितल्याचे समजते. टप्प्या-टप्प्याने सर्व शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी बंधनकारक केली जाणार आहे. आहार शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची व्यवस्था करावी लागते. तो खर्च पाहता गॅस जोडणी स्वस्त व आहार झटपट शिजविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आहार शिजविताना वेळेची बचत होणार असल्याने आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी महत्त्वाची ठरणार आहे.
तालुक्यातील १८७ पैकी केवळ तीनच शाळांमध्ये गॅस जोडणी
By admin | Published: December 02, 2015 2:18 AM