शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गौरीच्या स्वागतार्ह बाजारपेठ सज्ज

By admin | Published: September 19, 2015 3:29 AM

श्रावण सरला की वेध लागतात ते गौरी, गणेशाच्या आगमनाचे. भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते.

आगमन गौराईचे : अनुराधा नक्षत्राचा मुहूर्त; घरोघरी तयारी पूर्णश्रेया केने  वर्धाश्रावण सरला की वेध लागतात ते गौरी, गणेशाच्या आगमनाचे. भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात असल्याने स्थानिक बाजारपेठेत या काळात ग्राहकांची खरेदीकरिता लगबग दिसते. महालक्ष्मीचा थाटमाटही मोठा असल्याने त्याकरिता लागणारे साहित्य, देवीचा श्रृंगार, प्रसाद यांची खरेदीही तितकीच मोठी असते. गौरीचे आगमन अवघ्या एका दिवसावर आले असून यानिमित्त स्थानिक बाजारपेठेचा घेतलेला आढावा. मात्र सततच्या पावसामुळे अनेक व्यावसायिकांना अडचणी झाल्याचेही दिसून आले.या काळात गौरी ही तिच्या माहेरी वास्तवास येते, असा उल्लेख पुराणात आणि आख्यायिकात आहे. तीन दिवसांकरिता येणाऱ्या या माहेरवाशीनीच्या आगमनाकरिता घरोघरी गृहिणी नानाविध तयारी करतात. गौरी जिथे विराजित होते ते स्थान फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करून सुशोभित केले जाते. ही गौराई कुठे बंगईवर तर कुठे सुशोभित शामियानात स्थापित केली जाते. सासुरवासीचे माहेरी आल्यानंतर जसे स्वागत केले जाते तोच थाट गौराईच्या आगमनाचा असतो. घरोघरी उत्साहाच्या वातावरणात तयारीची लगबग सुरू झाली आहे. मोत्यांच्या दागिन्यांना पसंतीगौरीचा साजश्रृंगारही विशेष असतो. देवीचा मुकुट, कंबरपट्टा, गळ्यातील दागिणे मोतीचा वापर करून बनविण्यात आली आहे. यंदा मोतीची बनावट असलेल्या दागिण्यांना अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. यातही श्रीमंती हार, तोडे, लक्ष्मीहार अशी नाविन्यपूर्ण दागिण्यांनी खरेदी अधिक होत आहे. या दागिण्यांची किंमत ३०० रुपये जोडी आहे. पौराणिक मालिकेत मोतीच्या बणावटीचे दागिणे दाखविण्यात येतात. त्यामुळे याचा प्रभाव येथेही दिसून येतो.गौराईसह झोला, झोलीच्या कपड्यांची खरेदी गौरीला साडी नेसविण्यात येतात. यासह झोला, झोलीसाठी घागरा, चुनरी, धोती असे पोशाख विक्रीला आहेत. हे पोषाख खास मथूरा, दिल्ली येथून स्थानिक बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध आहेत. आकर्षक बनावट आणि रंगसंगतीमुळे या पोषाखांची मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या पोषाखाची किंमत ३०० रुपये जोडी ते एक हजार रुपयांपर्यंत आहे.गौरीची सपूर्ण मूर्ती साडेतीन हजारांपर्यंत संपूर्ण गौरीच्या मूर्तीची किंमत ३ हजार ५०० ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. गौरीची मांडणी करताना पायली, हात किंवा धड, मुखवटा असते. पायली तीन आकारात उपलब्ध आहे. यातील मोठ्या आकारातील पायली एक हजार रुपयांपर्यंत आहे तरं मध्यम आकारातील ७०० ते ९०० रुपयांना, छोट्या आकारातील पायली ३०० ते ३५० रुपयांना उपलब्ध आहे. मुखवटे ७०० ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. हात अकराशे ते दीड हजार रुपयांना आहे. या उत्सवावर महागाईची झळ दिसून येत आहे. वस्तूंची किंमती वाढल्या आहेत. मातीच्या मुखवटे विशेष आकर्षक दिसत नसल्याने पीओपीचे मुखवटे बाजारात विक्रीला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.स्थापनेचा मुहूर्तमहालक्ष्मीची स्थापना भाद्रपद शुद्ध षष्ठीला दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. कुळाचारप्रमाणे गौरीचे आवाहन करावे, शुद्ध सप्तमीला दुपारी २ वाजून २० मिनिटांपर्यंत भद्रा आहे. तरीही देवीला महानैवद्य करण्यास स्थिती अनुकुल आहे, अशी माहिती पंचाग अभ्यासक श्रीराम मगर यांनी दिली.