लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मार्चला होऊ घातल्या आहेत. यामुळे असून गावागावामध्ये निवडणुकीच्या मोर्र्चेबांधणीला वेग आला आहे. नेतेमंडळी मतदारांच्या गुप्त भेटी घेताना दिसत आहेत. प्रथमच जिल्ह्यात ५० टक्क्यांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहे.३६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होत असून ९ मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे आहे. ११ ला नामनिर्देश पत्राची छानणी होईल. १३ ला नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह देऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. २४ ला मतदान तसेच २५ मार्चला मतमोजणी होईल.सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची थेट निवडणूक होत असल्याने रंगत आली आहे.निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीचे व सरपंचाचे आरक्षण, मनगाव (अनुसूचित जाती) वडगाव (अनुसूचित जाती महिला) वासी (अनुसूचित जाती ) कारडा ( अनुसूचित जाती) धोंडगाव ( अनु. जाती महिला ) अंतरगाव (अनुसूचित जाती) फरीदपूर (अनु जमाती माहिला) सेवा (अनु जमाती महिला) सिल्ली (अनु. जमाती महिला ) नांद्र्रा (अनु जमाती महिला) निरगुडी (अनुसूचित जमाती ) निंभा (अनुसूचित जमाती) शेंडगाव (ना.मा. प्रवर्ग) डोंगरगाव (ना.मा. प्रवर्ग) बोथुडा (ना. मा. प्रवर्ग महिला) विखणी (ना.मा. प्रवर्ग ) पारडी ( ना.मा. प्र. महिला ) रामनगर ( ना.मा. प्र. महिला) आजदा (ना.मा. प्र .महिला) मांडगाव (सर्वसाधारण महिला) नंदोरी (सर्वसाधारण महिला) वायगाव ( ह) (सर्वसाधारण) लसणपूर (सर्वसाधारण महिला) धामणगाव (सर्वसाधारण) तास (सर्व साधारण महिला) पिंपळगाव (सर्वसाधारण) आरंभा (सर्वसाधारण) पाठर (सर्वसाधारण माहिला) उंदिरगाव (सर्वसाधारण) बावापूर (सर्वसाधारण) उमरा (सर्वसाधारण) गोंविंदपूर (सर्वसाधारण महिला) बरबडी (सर्वसाधारण महिला) भोसा ( सर्वसाधारण माहिला) किन्हाळा (सर्वसाधारण) कळमना (सर्वसाधारण महिला) असे आरक्षण आहे. यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये महिला राज येणार आहे.सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका यशस्वी पार पाडण्याकरिता नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार निवडणूक अधिकारी के. डी. किरसाण, पंकज वाटमोडे आदी कार्यरत आहेत.
समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:45 PM
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मार्चला होऊ घातल्या आहेत. यामुळे असून गावागावामध्ये निवडणुकीच्या मोर्र्चेबांधणीला वेग आला आहे. नेतेमंडळी मतदारांच्या गुप्त भेटी घेताना दिसत आहेत.
ठळक मुद्देगावागावांत मोर्चेबांधणीला वेग : २४ मार्चला होणार मतदान