लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बॅकांनी तरूणांना व सर्वसामान्य लोकांना तत्काळ मुद्रा कर्ज वितरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. गौतीर्थावर आर्वी येथे आयोजित शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरूण, शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश अग्रवाल म्हणाले की, पायपीट करुन ही राष्ट्रीय बँकातून कर्ज मिळत नाही व पर्याय नसल्याने महागड्या व्याजावर खाजगी कर्ज घ्यावे लागते. वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थानांना रिजर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटपाचे सारखे निकष असतात, मग आम्हाला विविध कारणे समोर करुन राष्ट्रीयकृत बँका कर्ज का नाकारतात आणि पर्याय नसल्याने आम्ही खाजगी वित्तीय संस्थानांकडून महागड्या व्याजात कर्ज घेतो. मग या राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त आमच्या खात्यातून किमान ठेवीच्या नावाखाली पाच पाच हजार कोटी लाटायचे आणि उद्योजकांनी केलेला तोटा भरुन काढायचा हा अनैतिक व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी मुद्रा कर्ज आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी सीबील तपासण्याचे औचित्य काय? हा फक्त कर्ज नाकारण्यासाठीचा डाव नाही का? असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात आपण स्वत दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेद्रकुमार यांना भेटलो शेतकरी, बेरोजगार यांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरण करणे असो वा शिक्षणासाठी कर्ज असो त्यांचे निकष बदलविले पाहिजे. सामान्यांना वेढीस धरणारे धोरण नको असे पत्र देऊन स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.मुद्रा मेळाव्याचे होणार जिल्हाभर आयोजनआॅटोचालक, फेरीवाले, चारचाकी दुरूस्ती करणारे कारागिर, पानठेला चालक, चहा विक्रेते,चौक चौपाटीवरील नाश्त्याचे ठेले चालविणारे, सुतार, गवंडी, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला विक्रेते या सर्वांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकानी तरुणांचे आणि व्यावसायिकांचे मेळावे आयोजित करणार असून चार्टेड अकाउंंटट व निवृत्त बँक व्यवस्थापक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे अग्रवाल म्हणाले.
सर्वसामान्य, तरूणांना उद्योगासाठी मुद्रा कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:16 PM
राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्र्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेंद्र कुमार यांना दिले पत्र