लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. पी. पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.याप्रसंगी विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रांत उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग भालशंकर, जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे, कार्यवाह महेंद्र सालंकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर बैठकीदरम्यान संघटनेकडे प्राप्त विविध तक्रारी व समस्या यांच्या निवारणार्थ शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याशी चर्चा करण्यात आली.इतकेच नव्हे तर याप्रसंगी जुनी पेंशन योजना लागू करणे, डीसीपीएस हिशेब चिठ्या, दहा टक्के शासन हिस्सा व त्यावरील व्याज याबद्दल सध्यस्थिती, वरिष्ठ व वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण सध्यास्थिती, जिपीएफ पावती देणे, थकीत वेतन देणे, मार्च महिन्याचे वेतन, संचमान्यता २०१७-१८ सध्यास्थिती, नवीन शालार्थ आयडी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, वैद्यकीय देयके, सेवापुस्तक नोंदी व सेवाज्येष्ठता यादी एक कॉपी कर्मचारी यांना देणे, २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळा किती व कर्मचारी संख्या तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या वैयक्तीक समस्या मांडून बहूतांश तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथ.) कानवडे यांच्यासोबत शालेय पोषण आहार व प्राथमिक शिक्षकांच्या इतर तक्रारींवर चर्चा करण्यात आली.यावेळी धर्मपाल मानकर, संजय पाटील, मंदा चौधरी, प्रवीण देशमुख, शशांक हुलके, प्रमोद खोडे, सुरेश बरे, आर. आर. वाघमारे, सुनील दुम्पलवार, श्याम चित्रकार, अशोक घारे, गोपाल खंडागडे, सुहास गवते, सुभाष तेलरांधे, संभा घाटुर्ले, रामदास लाकडे, अनिल पोटदुखे, अरूण कहारे, सतीश लोखंडे, सुभाष गभन आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ तोडगा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:13 PM
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. पी. पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
ठळक मुद्देविमाशी संघाची शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा