दिलीप चव्हाणसेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. या सर्वधर्म प्रार्थनेला गांधीवादींसह सुजाण नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महात्मा गांधी यांची हत्या १९४८ मध्ये करण्यात आली. गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून देशात नव्हे तर जगात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. परंतु, भारत देशातीलच काही लोकांनी महात्मा गांधी यांच्याबाबतचा द्वेष मनात कायम ठेवून महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार निंदनियच असल्याचा ठपका ठेवत त्या सर्वांना सद्बुद्धी मिळो यासाठी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही तरुणांसह अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे मत यावेळी काही मान्यवरांनी मांडले. सर्वधर्म प्रार्थनेला बारा राज्यातील चाळीस शिबिरार्थ्यांसह शोभा कवाडकर, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल, नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर, विजय धुमाळे आदींची उपस्थिती होती.बॉक्सतो प्रकार घृणास्पद - तौफीक मुलानीगांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचा प्रकार हिंदू महासभेने केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. बापूंना मारण्याचा प्रकार अनेकदा देशात झाला. अशा कृत्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही परमेश्वराकडे या व्यक्तींना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो, असे याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव तौफिक मुलानी म्हणाले.बॉक्सहा प्रकार अपमान करणाराच - कुसूम पांडेही घटना गांधीजींचा अपमान करणारीच आहे. शिवाय त्यांचे विचार व कायार्चा अपमान करणारी असून या देशातीलच लोकांनी असा निंदनिय प्रकार करावा ही शोकांतीका आहे. बापूंना देशच नव्हे तर संपूर्ण जग मानते. त्यांनी जे काही केले ते सर्व देश व मानव जातीसाठी केले. बापूंना लॉर्ड माऊंटबॅटन मानत होते; पण आपल्याच लोकांनी असे कृत्य करावे हे दुर्दैवच असल्याचे आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांनी सांगितले.बॉक्सगांधी विचार कुणी संपवू शकत नाही - योगेंद्र पाटीलगांधीजींनी अहिंसेचा विचार या देशाला नव्हे तर जगाला दिला. त्यांनी सद्भावना निमार्नाचे काम केले. गांधीजींवर जिवंत असताना हल्ले झाले. त्यांचा खून करण्यात आला; पण आजही त्यांच्यावरील हल्ले थांबलेले नाही. बापूंच्या विचारांना कुणी संपवू शकत नाही. त्या निंदनिय काम करणाºयांना परमेश्वर सद्बुद्धी देवो, असे शिबिराचे आयोजक योगेंद्र पाटील यांनी सांगितले.
गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:13 PM
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली.
ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना १२ राज्यातील शिबिरार्थ्यांचा सहभाग