लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/वडनेर : हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर बंदूक ताणल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील धोची येथे वाळूघाटधारकांने गावकºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. घाटधारकांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे गावात तीव्र रोष व्यक्त होत आहे.ज्ञानेश्वर वासुदेव इंगळे रा.धोची असे जखमीचे नाव आहे. धोची या गावातील वाळू घाटाचा लिलाव झाला असून घाटधारक वाळूची जड वाहने गावातील रस्त्याने नेत असल्यामुळे गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. म्हणून माजी उपसरपंच प्रकाश देवराव बावने यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मंगळवारी रात्री घाटावर जाणारी सर्व वाहने अडवून या मार्गाने वाहने न नेता घाटाच्या मार्गाने वाहने नेण्याची विनंती केली. पण, गावकºयांच्या विनंतीला झुगारुन वाहनचालकांनी मुजोरी चालूच ठेवल्याने गावकºयांनी वाहने नेण्यास मज्जाव केला. तेवढ्यात घाटधारक अक्षय बुरांडे हा चारचाकी वाहनातून गावात आला. त्याने गावकºयांशी वाद घालत धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये ज्ञानेश्वर इंगळे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ हा वार लागल्याने हाताची नस कापल्या गेली. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाल्याने घाटधारक बुरांडे याने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला. गावकऱ्यांनी ज्ञानेश्वर यांना सुरुवातीला वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने नागपुरला हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कृष्णा अनंता राऊत यांच्या तक्रारीवरुन घाटधारक बुरांडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घाट एकाच्या नावे उपसा करतात दुसरेचवर्षभराच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पहिल्या टप्प्यात दहा घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातील दोन घाटांचा काही तांत्रिक बाबीमुळे लिलाव झाला नसून आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. धोची हा वाळूघाट आरपीपी ईन्फ्र ा प्रोजेक्टस लिमिटेड यांनी घेतला.परंतु या घाटातील वाळू उपसा करण्याचा कंत्राट अक्षर बुरांडे व साटोणे यांनी घेतल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. घाटावर किंवा गावात वाळूघाटासंबधीत काही घटना घडली तर त्याला वाळूघाट ज्याच्या नावे आहे. त्याला दोषी ठरविले जात असल्याने आता आरपीपी ईन्फ्र ा प्रोजेक्टस लिमिटेड कंपनीवरही कारवाई होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जड वाहतुकीने गावकरी हैराणधोची या घाटावर जाण्याकरिता गावाबाहेरुन रस्ता असून तो जडवाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे वाळूघाटधारकांनी आता गावातील रस्त्याने वाहतूक वळविली. रात्रभर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याने गावातील रस्तेही निस्तानाभूत होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर या जड वाहतुकीने अपघाताचाही धोका बळावला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ही वाहतूक गावाबाहेरुन करण्याची विनंती घाटधारकाला केली असता त्याने चाकूहल्ला करुन आपली मुजोरी खपविली. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनामुळेच यांची हिंम्मत वाढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. घटनेनंतर आरोपी वाहनासह पसार झाल्याने त्यांना पुढच्या गावात अडविण्याचा प्रयत्न केला परंतु तेथूनही ते वाहन सोडून पळाले. संतप्त गावकऱ्यांनी वाहनाच्या काचा फोडल्या. या आरोपीला तत्काळ अटक करुन हा घाट बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.घाटधारकाच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेला ज्ञानेश्वर इंगळे आणि घटनेमुळे गावात गोळा झालेले सतप्त नागरिक.
घाटधारकाचा गावकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 9:58 PM
हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर बंदूक ताणल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील धोची येथे वाळूघाटधारकांने गावकºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. घाटधारकांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे गावात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देधोची गावातील प्रकार : हिंगणघाट विभागातील महिन्याभरात दुसरी घटना