प्रफुल्ल लुंगे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर निबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. अनामत मध्ये टाकलेल्या कापसामुळे जिनिंग मालकांस आयताच कापूस मिळतो. शेतकरी सुद्धा भाव वाढल्यावर आपण अनामत मोडू अशा अविभावात असतो; पण पुन्हा जर एकदा २०१४ ची पुनरावृत्ती झाली तर ‘जिनिंग मालक तुपाशी अन् कपाशी उत्पादक उपाशी’ या युक्ती प्रमाणेच परिस्थिती ओढावणार आहे. आठ कोटींच्या फसवणुकीनंतर शेतकरी अनामतच्या चक्रव्यूहात अडकत असल्याने निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.सन २०१४ मध्ये अनामत पद्धतीत जिनिंगमध्ये टाकलेल्या कापसाच्या रक्कमेपोटी तालुक्यातील जवळपास ४०० कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आठ कोटी रुपयांनी फसवणूक झाली होती. त्यातील एकाही शेतकऱ्याला कापसाची एक दमडी देखील मिळाली नाही. त्यानंतरही तालुक्यातील काही जिनिंग मध्ये भाव वाढीच्या लालसेपोटी शेतकरी आपला कापूस अनामत मध्ये टाकत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी अनामतच्या चक्रव्यूहात अडकत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत अनामत पद्धत ही कापूस उत्पादक शेतकºयांसाठी पुन्हा एकदा ठग्ज आॅफ कापूसस्तान पद्धत तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. येथील श्रीकृष्ण जिनिंग अॅन्ड प्रेसिंगमध्ये सन २०१४ ला अनामत मध्ये टाकलेल्या कापसाच्या चुकाऱ्या पोटी चारशे शेतकऱ्यांची आठ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर शेतकरी आणि जिनिंग मालक यांच्यातील न्यायालयीन संघर्ष सर्वश्रुत आहे. अजूनही त्या शेतकऱ्यांना कापसाची एक छदामीही मिळाली नाही. शेतकरी जास्त भावाच्या लालसेने आपला कापूस अनामत मध्ये टाकून पुन्हा एकदा चक्रव्यूहात अडकत असल्याचे चित्र आहे.२०१४ मध्ये प्रकरण पोहोचले होते न्यायालयाततालुक्यातील काही जिनिंगसह आंजी व खरांगणा येथील जिनिंग मध्ये शेतकरी व जिनिंग मालक यांच्यातील कापूस भाव वाढीचा अनामत नामक फसवणुकीचा खेळ खेळला जात असल्याचे बोलले जात आहे. भविष्यात कापसाच्या भावात मोठी चढ-उतार झाल्यास किंवा जिनिंग मालकांस नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमका हाच प्रकार २०१४ मध्ये श्रीकृष्ण जिनिंग अॅन्ड प्रेसिंग येथे घडल्याने ४०० शेतकऱ्यांना आठ कोटींच्या रक्कमेसाठी न्यायालयात जावे लागले.उत्पादनात घट होण्याची शक्यतायंदाच्या वर्षी कापसाचा हमीभाव ५,४५० रुपये आहे. पण, सध्या ५,६०० ते ५,८०० रुपये असा दर कापसाला मिळत आहे. कापसाच्या शासकीय खरेदीला मुहूर्त सापडत नाही. कापूस उत्पादक शेतकरी मागील वर्षीच्या बोंडअळीच्या प्रकोपातून कसाबसा सावरत असतानाच यावेळी सुरुवाती पासूनच बोंडअळीने शेतकऱ्यांना जेरीस आणले. त्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार हे जवळपास निश्चित आहे.भाववाढीची आशा कायमयंदा कापूस उत्पादनात घट येईल, असे जानकार शेतकरी सांगत असले तरी उत्पादन खर्चावर आधारीत भाव अद्यापही कापसाला मिळत नसल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढण्याची आशा आहे.भविष्यात होणारी फसगत टाळण्यासाठी कुठल्याही शेतकऱ्याने अनामत कापूस विक्रीचा व्यवहार करू नये. शिवाय जिनिंग मालकांनीही या पद्धतीचा व्यवहार केल्यास आणि शेतकºयांची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून जिनिंग मालकावर कारवाई करण्यात येईल. शेतकºयांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण स्वत: पुढाकार घेवून जिनिंग मालकांना पत्र पाठवू. शिवाय वरिष्ठ अधिकाºयांची चर्चा करून योग्य कार्यवाही करू.- राजेंद्र वाघे, सहाय्यक निबंधक, सेलू.
जिनिंग मालक तुपाशी अन् कापूस उत्पादक उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:59 PM
कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर निबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. अनामत मध्ये टाकलेल्या कापसामुळे जिनिंग मालकांस आयताच कापूस मिळतो. शेतकरी सुद्धा भाव वाढल्यावर आपण अनामत मोडू अशा अविभावात असतो; पण पुन्हा जर एकदा २०१४ ची पुनरावृत्ती झाली तर ‘जिनिंग मालक तुपाशी अन् कपाशी उत्पादक उपाशी’ या युक्ती प्रमाणेच परिस्थिती ओढावणार आहे.
ठळक मुद्दे८ कोटींच्या फसगतीनंतर शेतकरी अनामतच्या चक्रव्यूहात : निबंधक कार्यालयाने कारवाई करण्याची गरज