लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. त्याचा विचार करून सोयाबीन उत्पादकांना बोनस म्हणून रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले; पण अद्यापही सदर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. ती तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेची असून तसे निवेदन उपनिबंधकांना देण्यात आले आहे.शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव वाढून देण्यासाठी आंदोलने करण्यात आले. त्यावर शासनाने हमीभाव न वाढवता प्रती क्विंटल २०० रूपयाचे बोनस जाहीर केला. परंतु, हे बोनस अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहचलेच नाही. आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी १ हजार २३६ शेतकऱ्यांची थकीत बोनसची रक्कम १७ लाखांच्या घरात आहे. तर जिल्ह्यातील थकबाकीदारांची रक्कम कोटींच्या घरात आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या व बॅँकांच्यावतीने पीक कर्ज देऊन व्याजासहीत वसूल केल्या जाते. त्याचप्रमाणे शेतकºयांचा हक्काचे लाखो रूपये शासनाकडे पडून आहेत. येत्या ८ ते १० दिवसाच्या आत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही. तर पीक कर्जावर जेवढा व्याज दर बॅँकेकडून आकारला जातो तेवढाच व्याजदर लाऊन शेतकऱ्यांची थकीत बोनसची रक्कम त्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.येत्या काही दिवसात सदर मागणीवर विचार न झाल्यास जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या नेतृत्त्वात उपनिबंधकांना देण्यात आले. उपनिबंधकांना निवेदन सादर करताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आठ दिवसांचा दिला अल्टीमेटमजिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थकित असलेल्या सोयाबीनच्या बोनसची रक्कम येत्या आठ दिवसात देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात सोयाबीनच्या बोनसची रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या मदत क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोयाबीन उत्पादकांना बोनसची रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:52 PM
आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : उपनिबंधकांना निवेदनातून साकडे