लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. शिवसेनेच्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी केले.आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अनियमीत पावसामुळे दुबार पेरणीचे संकट आले. दुबार पेरणी केल्यानंतर समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात पुराने नदी-नाल्याच्या काठावरील शेतपिकाचे नुकतेच अंकुरलेले रोपटे खरडून नेले. तर काही ठिकाणी गाळ साचल्यामुळे ते दबल्या गेले. तसेच नदी काठच्या गावातील घरांची पडझड झाली. त्यामुळे शेतकरी व नागरीक अडचणीत आले आहे.बाधीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरीत मोका पाहणी करून शेती, घरे व पशुधन आदींचा आढावा घेऊन शासनाने शेतकºयांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. अशी मागणी शिवसेनाच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देताना शिवसेना उपनेते अशोक शिंदे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद भटे, तालुका प्रमुख रविंद्र लढी, महिला आघाडी तालुका संघटीका मंदा चौधरी, जि.प. सदस्या जयश्री चौखे, पं. स. सदस्य गजानन पारखी, बाळा जामुनकर, सुभाष बांगरे, महादेवराव बैलमारे, नितीन सरोदे, युवासेना तालुका अधिकारी अभिलाश गिरडकर, उपतालुका अधिकारी सुरज सोनटक्के, पंकज लाटकर, रवि ठोंबरे, रोशन थुटे, अतुल अरसपुरे, गजानन बोरेकर, विनायक मोंढे, सुरेश रामटेके, प्रभाकर सातारकर, मोरेश्वर धोटे, महेंन्द्र राऊत, देविदास वैद्य, प्रमोद रोकडे, बालु खुरपडे, चिंतामन येडे, सुभाष बाभुळकर, महादेव वांदीले, संजय ठोंबरे, विकास भोयर , मारोती आंबटकर, नितीन थुटे, सुरेशराव अराडे, कुणाल बोधे, तारकेश्वर मोहीतकर, ललित धोटे, चंद्रशेखर गौळकर, नंदु जाधव, गणेश अबलमकर, प्रीतम शिंदे, मुकींदराव भडे, प्रमोद चौखे, प्रकाश गव्हाने, दीगांबर चौधरी, ताराचंद भोयर, चेतन दुंडापुरे, प्रविण दाभणे, रविंद्र पुसदेकर, संजय खोंडे, गणेश कुटे, सुरज गेडाम, वैभव पांडे, अविनाश मांडवकर, ललित गोळकार, केशव वैद्य, अनंता कन्हाळक, रविंद्र पुसदेकर, साहील वेले, विकास वाघमारे, धीरज मांडवकर आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:23 PM
एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन