ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : गत आठवड्यात शहरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेतील आरोपी अजय सोनवने याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने उपविभागीय महसूल अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.आरोपी अजय सोनवने याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदर घटनेचा सखोल तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी हे प्रकरण विशेष गुन्हे शाखेकडे वळते करण्यात यावे. शिवाय या घटनेबाबतचा खटला अतिशीघ्र न्यायालयात चालविण्यात यावा. पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष धनंजय जाधव, उपाध्यक्ष कुणाल टिपले, शहर अध्यक्ष शुभांगी निनावे, सचिव रानी साखरकर, शिवम भोयर, शहर अध्यक्ष सनी बासनवार, गौरव गोहाडे, रूपेश लाजुरकर, धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, अजय मुळे, संदीप रघाटाटे, शुभम बालपांडे, निशांत ढवरी, प्रतिक गायकवाड, सौरभ वानखेडे यांच्यासह वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदे पदाधिकारी उपस्थित होते.
पीडितेला शासकीय मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:19 AM
गत आठवड्यात शहरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेतील आरोपी अजय सोनवने याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
ठळक मुद्देविद्यार्थी परिषदेची मागणी : उपविभागीय महसूल अधिकाºयांना साकडे