लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील आर.एस. मोहता मिल, गिमाटेक्स प्रायव्हेट लिमीटेड वणी, हिंगणघाट इटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क या कंपन्यांमध्ये कामगारांचे प्रचंड शोषण करण्यात येत आहे. येथील कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वीकारले व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने प्रा.तिमांडे यांनी सांगितले की आर.एस.आर मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्ष पुर्ण होत आहे. २०१५ पर्यंत या मिल मध्ये १३०० कामगार कार्यरत होते. २०० ठेकेदारी कामगार होते. परंतु २०१७ पासून कपडा खाता बंद करण्यात आला आहे. ज्या कामगारांनी कंपनीला कोट्यावधी रूपये मिळवून दिले. ते कामगार आता देशोधडीला लागले आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कामगारांना शासनाने न्याय द्यावा तसेच गिमाटेक्स या कंपनीत २५०० कामगार काम करतात. या कंपनीत मागील ८ वर्षापासून निवडणूक झाली नाही. कंपनी अॅक्टप्रमाणे किमान वेतनही दिले जात नाही. व्यवस्थापन व युनियनमध्ये तीन करारनामे झाले परंतू कामगारांचे शोषण केले जात आहे. महिला कर्मचाºयांना किमान वेतन दिले जात नाही. अशी माहिती ना. जयंत पाटील यांना कामगारांनी दिली. तसेच हिंगणघाट इटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क येथील कामगारांना फॅक्ट्री अॅक्टनुसार सुविधा दिल्या जात नाही. या कंपनीच्या श्याम बाबा गारमेंट कंपनीत कामगारांना किमान वेतना प्रमाणे रक्कम दिली जात नाही. पीएफचे पैसे जमा केले नाही, १ तासाचा लंच, १ वर्षाची पगारवाढ आदी मागण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. रेडिमेड कापड तयार करण्याच्या कंपनीत २५० महिला काम करतात त्यांना विनामुल्य प्रशिक्षण दिले गेले त्यानंतर कंपनी सुरू केल्यावर ५० रूपये दिवस प्रमाणे पगार दिल्या जातो. किमान वेतन कोणालाही मिळत नाही. अशी माहिती राजु तिमांडे यांनी जयंत पाटील यांना दिली. कामगारांनी मंत्रीमहोदयांना आपल्या अडचणी सांगितल्या. मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी झाले होते.
कामगारांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:00 AM
कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वीकारले व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
ठळक मुद्देविधानभवनावर धडकला मोर्चा : वित्तमंत्र्यांनी जाणल्या समस्या