शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे द्या

By admin | Published: June 06, 2017 1:16 AM

नाफेडने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली आहे. परंतु, दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही...

मागणी : निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नाफेडने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली आहे. परंतु, दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही तुरेचे चुकारे देण्यात आले नाही. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार असल्याने त्यांना पैशाची गरज भासणार आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकाने तात्काळ द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.नाफेडने जिल्ह्यात खरेदी केलेल्या तुरीचा आकडा मोठा आहे. आजनगाव येथील सुमेध विठ्ठल सोनपितळे, विनोद सुर्यभान भिसे यांच्यासह जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे देण्यात आलेले नाही. तुरीचा चुकाराच अद्यापही मिळाला नसल्याने यंदा बियाणे खरेदी करायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वेळीच बियाणे खरेदीसाठी पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना शेवटी सावकारांच्या दारात जावे लागेल. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे तुर उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना माजी जि.प. सभापती मिलिंद भेेंडे, विमल वरभे, महेश आगे, विनोद तिमांडे, गणेश वादांडे, अतुल तिमांडे, विजय तळवेकर, सुशील वडतकर, संजय अलोणे, अतुल बावणे, संदीप कलोडे, प्रमोद वरभे, दीपक तिमांडे आदींची उपस्थिती होती.