लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे, दीड एकरच्या आत जर भूसंपादन करून शेतजमिनीचा तुकडा पडत असेल तर तो सुद्धा या महामार्गासाठी घेतला जाईल. तसेच त्याचाही याच नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल, असे समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने व शासनाने आश्वासन दिलेले होते. परंतु जमिनींचे अधिग्रहन करतांना शेतजमिनीचे दीड एकर व त्यापेक्षाही कमी आकाराचे तुकडे शिल्लक ठेवले आहे. त्याचे अधिग्रहन करुन मोबदला दिला नाही.या तुकड्यांमध्ये शेतकरी शेती करू शकत नसल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे भूसंपादन केल्यावर राहिलेली दीड एकरपेक्षा लहान शेतजमिनीचे तुकडे सुद्धा त्याच किंमतीत समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने घ्यावेत. त्याचा मोबदला शेतकºयांना तत्काळ द्यावा, तसेच या शेजमिनीच्या अधिग्रहनामुळे अनेक शेतकरी त्यांची इच्छा नसताना सुद्धा विस्थापित झालेले आहे. त्यामुळे शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार यासर्व शेतकºयांना, प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या वारसानांना प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून शासनाच्या विविध सवलतींचा व शासकीय नोकरीमधील समांतर आरक्षणाचा लाभ होऊ शकेल, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली.समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारला निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अॅड. महेंद्र धोटे, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, विशाल हजारे, श्रीराम चव्हाण, कविता मुंगले, रेखा खेळकर, कवडू बुरंगे, श्रीकांत वंजारी, गंगाधर मुडे, विनायक पावडे, प्रभाकर राऊत, संजय म्हस्के, अरूण कनेरी, शंकर येलोरे, मनोहर गोंदाने, सुभाष भोयर, सुशील झाडे, चंद्रशेखर दाते, सुनील सोमनकर, अविनाश वानखेडे, प्रभाकर वांढेकर, सुरेश तिजारे, श्याम जगताप यांच्यासह समृध्दी महामार्ग बाधित विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दिघे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
उरलेल्या शेतजमिनीच्या तुकड्यांचा मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:04 AM
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणी