शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

आम्हालाही धान्य द्या होऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM

कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची मुले गवंडी, हमाली अशाप्रकारची रोज मजुरी करतात. आज त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा टाहो : रेशनकार्ड नसलेल्यांचे शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : लॉकडाऊनच्या काळात सर्व जग थांबले, हाताला असलेले कामही थांबले, संघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगारांना वेतन देण्याचे आदेश शासनाने दिले. परंतु, असंघटित क्षेत्र जसे शेतमजूर, छोटे व्यावसायीक, सुतारकाम, पेंटर व अशा प्रकारे काम करणाऱ्यांचे कुठलेही उत्पन्न या काळात नाही. शासनाने सर्व रेशनकार्डधारकांना धान्य देण्याचे जाहीर केले. पवनारात एकूण १,५७६ रेशन कार्डधारक असून त्यापैकी अंत्योदय योजनेचे १३० लाभार्थी आहेत. अन्नसुरक्षा योजनेत १,१२० लाभार्थी तर कृषीचे ३१० लाभार्थी आहेत. यापैकी जवळपास ९५ टक्के धान्य वाटप पूर्ण झाले. परंतु, १०९ कुटुंब असे आहे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यांनी ग्रा.पं. कडे नोंदणी केली आहे. मात्र, त्यांना धान्य देण्यास अद्याप निर्णय झालेला दिसत नाही. पवनारात अनेक कुटुंबीय कामाच्या शोधात आले व ते पवनारचे रहिवासी झाले.कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची मुले गवंडी, हमाली अशाप्रकारची रोज मजुरी करतात. आज त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांनी ग्रा.पं.कडे नावाची नोंदणी केली आहे. अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. हाताला काम नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. कार्ड नसलेल्या १०९ कुटुंबांपैकी काही कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. ग्रा.पं. स्तरावर धान्य मिळण्यासाठी नावांची यादी तहसील कार्यालयात दिली असल्याचे सरपंच शालिनी आदमने यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना