शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अप्पर वर्धाने दिले जलदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:34 PM

नगरपंचायत प्रशासनाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्धा धरणाचे ममदापूर तलावात पाणी सोडण्यात आले. यामुळे दहाच दिवसात आष्टी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. रखरखत्या उन्हात पाण्याकरिता होणारी भटकंती थांबल्याने, सोबतच स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे आष्टीकरांनी नगरपंचायतीचे आभार मानले आहे.

ठळक मुद्देदहा दिवसात पाणीप्रश्न निकाली : नगरपंचायतीचे प्रयत्न; नागरिकांना दिलासा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायत प्रशासनाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्धा धरणाचे ममदापूर तलावात पाणी सोडण्यात आले. यामुळे दहाच दिवसात आष्टी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. रखरखत्या उन्हात पाण्याकरिता होणारी भटकंती थांबल्याने, सोबतच स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे आष्टीकरांनी नगरपंचायतीचे आभार मानले आहे.ममदापूर तलाव शंभर टक्के कोरडा पडल्याने आष्टी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. विरोधकांनी याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे सत्ताधारी खडबडून जागे झाले. पाण्याच्या विषयावर कुठलेही राजकारण न करता मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांना एकीचे बळ मागितले होते.नगराध्यक्ष अनिता भातकुलकर, भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष अनिता भातकुलकर, भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी ममदापूर तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविली. त्यानंतर अप्पर वर्धा धरण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या, पाणी सोडण्याला होकार मिळाला.तीन दिवस तलाव ८५ टक्के पूर्ण भरून घेण्यात आला. सुरुवातीला मुख्य केंद्राच्या सभोवताल १०० मीटर अंतरामधील गाळ काढण्यात आला. त्यानंतर तलावाच्या उर्वरित भागातील गाळ काढण्यात आला.जलशुद्धीकरण केंद्रही स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्यास सुरुवात झाली. अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी दिले नसते तर जूनच्या अखेरीसपर्यंत नळाला कोरड कायम राहिली असती. मात्र, प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २ मध्ये इंदिरानगरात काही समाजकंटकांनी पाण्याच्या टॅँकरवर दगडफेक करून वाहनचालकाला मारले. दुसºया दिवशी पैसे घेऊन पाणी विकण्याचा केविलवाणा प्रकार केला. मात्र, नगरसेवक ठोंबरे यांनी हा सर्व प्रकार धुडकावून लावत पुन्हा नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीने पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला. पाण्याच्या माध्यमातून नागरिकांची होणारी आर्र्थिक लूट थांबविली. अखेर अप्पर वर्धा धरणानेच जलदान दिल्याची भावना आष्टी शहरातील नागरिकांनी व्यक्त करीत नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहे.ममदापूर तलाव मागील १५ वर्षांपासून पाण्याने भरूनच राहिल्याने गाळ काढण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला. यावेळी तलावातील जलसाठा संपल्याने गाळ काढून अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याने भरण्यात आला. त्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यश आले.- अनिता भातकुलकर, नगराध्यक्ष, नगरपंचायत, आष्टी (शहीद).आम्ही विरोधक नक्कीच आहोत मात्र, आष्टी शहराच्या विकासासाठी सत्ताधारी गटाला सातत्याने मदत करण्याची आमची भावना आहे. पाण्यासाठी कर्तव्य पार पाडले.- अशोक विजयकर, भाजप गटनेते तथा नगरसेवक, आष्टी (शहीद).मागील दहा दिवसात सत्ताधारी आणि विरोधक यांनी चांगली भूमिका बजावली. त्यामुळे पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न मार्गी लावता आला.- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, नगरपंचायत, आष्टी (शहीद).