शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अवैध बांधकामांवर गंडांतर

By admin | Published: July 22, 2016 1:49 AM

बोरगाव (मेघे) ग्रा.पं. च्या हद्दीत अवैध बांधकमांचा सपाटाच सुुरू आहे. ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना न जुमानता स्वमर्जीने होत असलेल्या

प्रपत्राद्वारे शासनाची दिशाभूल : बोरगाव ग्रा.पं. हद्दीत बांधकामांचा सपाटा वर्धा : बोरगाव (मेघे) ग्रा.पं. च्या हद्दीत अवैध बांधकमांचा सपाटाच सुुरू आहे. ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना न जुमानता स्वमर्जीने होत असलेल्या घरांच्या बांधकामावर गजराज चालणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी, सरपंचांनी स्पष्ट केले. बांधकाम करीत असलेल्या नागरिकांनी खुलाशातून शासनाचीच दिशाभूल केल्याचेही उघड झाले आहे. यामुळे सर्वच अवैध बांधकामांवर गंडांतर येणार असल्याचे संकेत ग्रा.पं. प्रशासनाने दिले आहेत. नीता आणि अरविंद बक्षीजी वैद्य या दाम्पत्याने ११ मार्च रोजी दत्तूजी सोमाजी माकडे यांचे ६० फुट लांब, २५ फुट रूंद असे १५०० चौरस फुट जागेतील घर खरेदी केले. त्यावेळी चार खोल्या, विहीर आणि संरक्षण भिंत होती; पण केवळ ७७७ चौरस फुट जागेतच बांधकाम होते. याबाबतचे दस्ताऐवज बोरगाव ग्रा.पं. मध्ये आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या अरविंद वैद्य यांनी तीन महिन्यांपूर्वी कोणतीही परवानगी न घेता घर पाडले. यानंतर बांधकामाचीही परवानगी घेतली नाही. स्वमर्जीनेच घराचे बांधकाम सुरू केले. भूखंड असलेल्या जागेत बांधकाम होत नसल्याचे दिसते. यामुळे ग्रा.पं. च्या मासिक सभेत ठराव घेवून त्यांना नोटीस बजावण्यात आला. यात काम थांबविण्याच्या सूचना केल्या. शिवाय भूखंडाबाबतचे दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले. यावरून वैद्य यांनी माहिती सादर केली. यात घराला भेगा पडल्याने घराची केवळ डागडुजी करीत असल्याचा उल्लेख केला. प्रत्यक्षात त्यांनी संपूर्ण घरच जमीनदोस्त करून पुन्हा बांधकाम करीत असल्याचे दिसून आले. शिवाय ही माहिती मुख्यमंत्री, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, मानवाधिकार कल्याण समितीकडे पाठविल्याचे दर्शविले. प्रत्यक्षात त्यांनी ही माहिती कुणालाही दिली नाही. यावरून यातील सत्य पूढे येते. वर्धा लगतच्या अकरा गावांत अशी अवैध बांधकामे होत आहे. बोरगाव येथील बांधकामांवर आता ग्रा.पं. च कार्यवाही करणार असल्याची माहिती उपसरपंच मोहन येळणे यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी) प्रशासनाचा बुडतोय महसूल घर, दुकान, फ्लॅट आदी कशाचेही बांधकाम करावयाचे झाल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेणे गरजेचे असते; पण गत काही वर्षांपासून शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या हद्दीत परवानगी न घेताच बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे. हा मुद्दा वरिष्ठ स्तरापर्यंत चर्चिला जात असताना बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या नोटीस व ठरावालाही नागरिक जुमानत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी सर्वच अवैध बांधकामांवर गंडातर येणार आहे. बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने तत्सम पावले उचलली आहे. मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला असून संबंधितांना नोटीस बजावण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरल्याचे दिसून येत आहे.