लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्याचा संकल्प घेऊन गरीबी निर्मूलन, हिंसामुक्तीकरिता २ ऑक्टोंबर २०१९ रोजी दिल्ली येथून निघालेली जय जगत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप ३० रोजी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत होणार असल्याची माहिती रमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली.रमेश शर्मा पुढे म्हणाले, बा-बापू यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त एकता परिषदेचे संस्थापक डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा या वैश्विक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेत १० देशातील ५० पदयात्री गांधीजींचा संदेश जगात पोहचविण्याचे काम करीत आहेत.जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे. भारतातील पदयात्रेचे पहिले चरण सेवाग्राम आश्रमात पूर्ण होणार असून त्यानंतर विदेशात ही यात्रा रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.२५ रोजी पदयात्रा अग्निहोत्री महाविद्यालयाच्या परिसरात दाखल होईल. २६ रोजी आतंरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठात पोहचेल तेथे चार दिवस २९ रोजीपर्यंत शांतीयात्रेचे महत्व पटवून देण्यात येईल. तसेच मार्गदर्शन करण्यात येईल. ३० रोजी हिंदी विश्वविद्यालयातून पदयात्रा निघून सेवाग्राम येथील आश्रमात पोहचेल. सेवाग्राम येथील संमेलनात छत्तीसगढचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षा नाना पटोले, छत्तीसगढचे अध्यक्ष आदी उपस्थित राहतील.त्यानंतर ही यात्रा ईरानमार्गे १० देशातून प्रवास करीत २ ऑक्टोबर २०२० ला जिनेवा येथे पोहचणार आहे. यात जगभरातून पाच हजार पदयात्रींचा सहभाग राहणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारांशी संवाद साधताना योगेश मथुरीया यांनी सांगितले की, पदयात्रेत सहभागी विदेशी नागरिकांनी आपले घरदार सोडून सहभाग घेतला आहे. यात्रेत १५ विदेशी महिलांचाही सहभाग आहे.महाराष्ट्रातून सेवाग्राम येथील जलांधरभाई आणि रमेश मिश्रा हे यात्रेत सहभागी झालेले आहेत. नव्या लोकांना, युवकांना जोडण्यासाठी तसेच शांती अहिंसेचा संदेश घेवून ही जय जगत पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शांतीपूर्ण विश्वाच्या निर्मितीकरिता वैश्विक पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM
जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे.
ठळक मुद्देरमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती : जय जगत यात्रा गुरुवारी सेवाग्रामात