लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.तळेगाव (टा) येथे मिलिंद भेंडे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित ‘समाज मित्र गौरव पुरस्कार’ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार देशमुख, केंद्रीय मंत्र्यांचे सल्लागार सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जिल्हा शिवसेना प्रमुख प्रशांत शहागडकर, आरपीआय अध्यक्ष विजय आगलावे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, धनराज तेलंग, जयंत येरावार, गजानन राऊत, नंदु झोटींग, जि.प. सदस्य विमल वरभे, पं.स. सदस्य महेश आगे, दशरथ भुजाडे तथा माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील विकासात्मक कार्य करणाºया ज्येष्ठ मान्यवर निर्मला येंगडे, किसनलाल चांडक, बाबाराव वाटखेडे, टी.सी.राऊत, मारोती अलोणे, ज्ञानेश्वर पोटदुखे, निळकंठ दाते, सुधाकर देवढे, के.जी. तळवेकर, लक्ष्मण सुरकार, दादाराव तपासे, रामदास मानकर, रामराव राऊत, रूख्माबाई खोडे, अनुसया खडसे यांचा समाजमित्र गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.याप्रसंगी विशेष सत्कार मूर्ती म्हणून महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर व महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष जयंत कावळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच अतुल तिमांडे, सुनील शिंदे, निखील भेंडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन रेवतकर, कृष्णाजी गुजरकर, सुभाष तपासे, पंचफुला महाजन, बेबी राऊत, जान्व्ही मानकर, कालिंदा वाटखेडे, सूरज हुलके, प्रज्वल हुलके, गजानन भोयर, उमेश तळवेकर, हरिदास डांगरी, देवराव तडस, मधुकर वाघमारे, दिलीप ढबाले, रविंद्र महाकाळकर, प्रशांत तपासे, प्रशांत सुरकार, राज कोपरकार, कैलास कोपरकार, कैलास कोपरकार, विजय सुरकार, अभय देवढे, अनंता कोपरकार, गणेश तुमसरे, हरिदास मोहिजे, अनिल महाजन, पंजाब वाळके, सुधीर खोंडे, रूपेश ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श तर आभार सरपंच अतुल तिमांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित झाले होते.
ज्येष्ठांचा गौरव म्हणजेच आपल्या गावाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:23 PM
गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसुरेश देशमुख : गावाच्या विकासाकरिता हातभार लावणाऱ्यांचा समाज मित्र गौरव पुरस्काराने सन्मान