लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाषण करण्यासाठी नाही तर कामे करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपणाला वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आपली नियुक्ती ही पक्ष नियोजनाचाच एक भाग आहे. पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बळावर गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक, करण्याचे उद्दिष्ट ठेवून दर आठवड्याला आपण वर्धेच्या दौऱ्यावर येणार आहो. शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्हा भगवामय करण्यासाठी सहकार्य करावे, आपणही ते केल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंतराव गुढे यांनी केले.नियुक्तीनंतर वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंतराव गुढे यांची प्रथमच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची आढावा बैठक स्थानिक विश्रामगृहात बुधवारी घेतली. याप्रसंगी ते पदाधिकारी, शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला माजी आमदार अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुधा शिंदे, डॉ. नारायण निकम, डॉ. शैलेश अग्रवाल, बाळासाहेब भागवत, नितीन हटवार, डॉ. निर्मल, उप जिल्हा प्रमुख राजेश सराफ, अनंत देशमुख, बंडू कडू, भारत चौधरी, तालुका प्रमुख गणेश इखार, रवींद्र चौहान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अनंतराव गुढे पुढे म्हणाले, जिल्ह्यात जे पदाधिकारी, शिवसैनिक आहे. त्यांच्याकडूनच जिल्ह्यात जनतेची कामे करून घ्यायची आहे. त्यामुळे कोणीही कानफुसकी करू नये. कानफुसकी करणाºयांनी आधी स्वतच्या कामाचा अहवाल सादर करावा, असा टोला लगावीत आता शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठीही काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार अशोक शिंदे यांनी जिल्ह्यात शिवसेनेने केलेल्या कामाची माहिती दिली. बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा भगवामय करण्याचे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:58 AM
भाषण करण्यासाठी नाही तर कामे करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपणाला वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आपली नियुक्ती ही पक्ष नियोजनाचाच एक भाग आहे.
ठळक मुद्देअनंतराव गुढे : शिवसेनेची आढावा बैठक