ऑनलाईन लोकमतवर्धा : एखादा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान, यंत्रसामग्री, विक्रीकरिता बाजारपेठ, आवश्यक बाबींचे व्यवस्थापन या बाबींची सविस्तर माहिती असणे गरजेचे असते, असे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे यांनी व्यक्त केले.स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वर्धा येथे शेळीपालन या १० दिवसीय प्रशिक्षणाला मंगळवारी प्रारंभ झाला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.डॉ. डायगव्हाणे पूढे म्हणाल्या की, शेळीपालन हा फक्त शेतीपूरक व जोड व्यवसाय राहिला नसून त्याला स्वतंत्र व्यावसायिक रूप आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्यातील देवळीत शेळीपालनासाठी बाजारपेठ तयार होत आहे. याचा लाभ संस्थेमधून प्रशिक्षित झालेल्या शेळी उद्योजकास निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे या व्यवसायात प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांसाठी चांगले दिवस येणार आहे, असेही सांगितले.स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवक व युवतींकरिता स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते. यातून गरजू व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंपूर्ण करण्याचे प्रशिक्षण नि:शुल्क दिले जाते. ही संस्था उत्कृष्ट उद्योजक बनण्यास मार्गदर्शन करते व ते ध्यानात घेत प्रशिक्षण देते. प्रशिक्षणानंतरही संस्था दोन वर्षापर्यंत पाठपुरावा करीत असते. आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. हे ध्यानात ठेवून ही प्रशिक्षण संस्था कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.शिबिरात संस्थेचे निदेशक अनिल पाटील म्हणाले की, तुम्हाला व्यवसायासाठी या प्रशिक्षणाची जोड मिळाली आहे. प्रशिक्षणामध्ये तुम्हाला शेळीपालन व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. व्यवसाय सुरू करताना येणारे अडथळे व त्यावर मात करून व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आत्मविश्वास, जिद्द, धैर्य, चिकाटी ठेवून मार्गक्रमण करावे. अडचणींवर मात कशी करता येईल, याबाबत प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणानंतरही दोन वर्षे आम्ही तुमचा पाठपुरावा करणार असून तुम्हाला मदत करणारत आहोत, अशी ग्वाही दिली.तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. गोपाळकृष्ण हजारे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना या व्यवसायातील संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन व बाजार व्यवस्थेविषयी सविस्तर मार्गदर्शन पुढील १० दिवसांत मिळणार असल्याचे सांगितले.प्रशिक्षणाला वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, आर्वी, समुद्रपूर, आष्टी, कारंजा आदी तालुक्यांतील प्रशिक्षणार्थी आले आहेत. शिबिराला प्रशिक्षक व्यंकटेश शेंडे, अविनाश पडोळे, योगिता खैरे, कार्यालय सहायक पवन डफरे, श्रीकांत काटोले आदी सहकार्य करीत आहेत.शेतीपूरकच नव्हे तर शेळीपालनाला स्वतंत्र व्यावसायिक रूपपूर्वी जनावरे पाळणे हे शेतीपूरक व्यवसाय मानले जात होते. त्याच दृष्टीने त्याकडे पाहिले जात होते; पण आत शेळीपालन हा युवकांसाठी स्वतंत्र व्यवसाय म्हणून सामोर येत आहे. शेळीपालनाला सध्या व्यावसायिक रूप आले असून युवकांनी यात रोजगार शोधणे गरजेचे झाले आहे. यासाठी स्टार स्वयंरोजगार संस्था प्रशिक्षण देत असून त्यांना योग्य मार्गदर्शनही करीत आहे.
शेळी विक्रीसाठी तांत्रिक ज्ञान व व्यवस्थापन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:38 PM
एखादा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान, यंत्रसामग्री, विक्रीकरिता बाजारपेठ, आवश्यक बाबींचे व्यवस्थापन या बाबींची सविस्तर माहिती असणे गरजेचे असते, ....
ठळक मुद्देप्रज्ञा डायगव्हाणे : देवळी येथे तयार होत आहे राज्यातील पहिली बाजारपेठ