लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलिसांनी सदर आरोपींची पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून तब्बल १०० ग्रॅम सोन, ४०० ग्रॅम चांदी व ४ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरट्यांनी दहा चोरीच्या गुन्ह्याची कबुली रामनगर पोलिसांना दिली आहे.रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृष्णनगर, जुनी म्हाडा कॉलनी, विद्याविहार कॉलनी, पिपरी (मेघे), कारला रोड, शिक्षक कॉलनी, न्यू स्टेट बँक कॉलनी, नालवाडीतील पद्मावतीनगर, धंतोली परिसरात मागील दहा महिन्यात मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्या. शिवाय शहरातील इतर ठिकाणीही चोरीच्या घटना घडल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारांना सज्ज केले. त्यानंतर खात्रीदायक माहितीच्या आधारे सदर टोळीतील काही सदस्यांना जेरबंद करण्यात आले. शिवाय रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रामनगर पोलिसांनी आरोपी रामु देविदास मुळे रा. इंदिरानगर झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा, राज उर्फ काल्या रामा दांडेकर, मारोती उर्फ माऱ्या रामा लष्कर दोन्ही रा. गिट्टी खदान वर्धा यांची पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, रामनगरचे ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर भलावी, संतोष कुकडकर, धर्मेद्र अकाली, निलेश करडे आदींनी केली.
चोरट्यांकडून रोखेसह सोने-चांदी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:24 PM
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
ठळक मुद्देरामनगर पोलिसांची कामगिरी : दहा गुन्ह्याची दिली कबुली