वर्धा - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोग्य कर्मचा-याकडून स्पीरिडसह इतर औषधांनी मनमर्जीने विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विलास रघाटाटे असे औषधांची विक्री करणाºया आरोग्य कर्मचा-याचे नाव असल्याचे सांगण्यात येते.अतिरिक्त शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड हे वर्धा येथे कार्यरत असताना वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्यपातळीवरील द्वितीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी या रुग्णालयाला राज्यातून द्वितीय क्रमांकाचे स्थानही देण्यात आले होते. पण सध्या याच रुग्णालयातून गरीब आणि गरजुंच्या वाट्याची औषध चक्क चढ्या दराने आरोग्य कर्मचारी विक्री करीत असल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे येथील काही परिचारिका रुग्णांच्या नातेवाईकांकडून देयकाचे पूर्ण पैसे घेतात. परंतु, त्यानंतर परिचारिका बिलात तडजोड करून काही पैसे स्वत:च्या फायद्यासाठी आपल्याच जवळ ठेऊन घेत असल्याचीही चर्चा सध्या रुग्णालयात होत आहे. विशेष म्हणजे याकडे अतिरिक्त शल्य चिकित्सकांचे दुर्लक्ष होत आहे. ‘तो’ आरोग्य कर्मचारी मद्यशौकीनजिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला आरोग्य कर्मचारी विलास रघाटाटे याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे त्याच्या याच वाईच सवईमुळे त्यांची अनेकदा वरिष्ठ अधिका-यांनी कानउघाडणी केली. शिवाय त्यांची इतर ठिकाणी बदलीही करण्यात आली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून त्याने मनमर्जी कामाचा सपाटाच लावल्याचे या व्हिडीओवरून दिसून येत आहे.
शासकीय औषधांची होते विक्री, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 8:42 PM