सेना रस्त्यावर : शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांकरिता पीक कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या संदर्भात अद्यापही राज्य सरकारने भुमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी शिवाजी चौक ते लिड बँकेपर्यंत मोर्चा काढून निषेध नोंदविला. यावेळी मागण्यांचे निवेदन लिड बँकेच्या व्यवस्थापकांना सादर केले. या आंदोलनात हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, माजी पं.स. सदस्य संतोष सेलूकर, दिलीप भुजाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.निवेदनातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पीक कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, सरकारची भुमिका अद्यापही सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजलेली नाही. या बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करावे, तसेच सध्या या निकशात किती लाभार्थी पात्र आहेत याबाबतची सत्यभूत माहिती कार्यालयात लावावी. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकेच्या सूचना फलकावर लावण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन लिड बँकेचे व्यवस्थापक वामन कोहाड यांनी स्वीकारले. पारदर्शी सरकारचा वेळकाढूपणा - शिंदेपारदर्शी सरकारने वेळकाढूपणा न करता सत्य शेतकऱ्यांना सांगावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलघेवडेपणा करीत आहेत. निव्वळ तोंड पाटीलकी करत भाषण आणि पब्लिसिटी करणे हा एकमेव धंदा असल्याचा आरोप माजी आमदार अशोक शिंदे यांनी केला
ढोल वाजवून शासनाचा निषेध
By admin | Published: July 11, 2017 12:56 AM