आॅनलाईन लोकमतपुलगाव : ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पहिल्याच अर्थसंकल्पात उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेचा प्रस्ताव पारित करून पाच कोटी गॅस जोडणी देण्याची घोषणा केली. अर्थसंकल्पातील सर्व योजना लोकोपयोगी असून जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.ईशा गॅस एजेन्सीद्वारे आयोजित उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, सात वर्षाच्या आधी झालेल्या सर्वेक्षणानुसार गॅस कनेक्शन देण्यात आले तरी त्याचा लाभ गरजू व योग्य लाभार्थ्यांना मिळत आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान घरकूल योजना कार्यान्वित केली. कॉँग्रेस सरकारने ६० वर्षांच्या काळात गरीबांना घरकूल दिले नाही. परंतु भाजपा सरकार २०२२ पर्यंत सर्वच गरजू घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.पी.जी. डेप्युटी जनरल मॅनेजर नागपूर विभाग अधिकारी प्रमोद काटकर होते. त्यांनी केंद्राच्या उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेबाबत सर्व माहिती दिली. राजेश बकाने भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मंचावर नगराध्यक्षा शितल गाते, नाचणगाव सरपंच सविता गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सावरकर, देवळी पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, माधुरी इंगळे, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, राहुल चोपडा, नितीन बडगे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, गटनेता राजेश जायस्वाल, सुरेश सुखिजा, संतोष तिवारी, आकाश दुबे, श्रवण तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात कौशिक पचारे आपटी, शोभा बावने आगरगाव, आमीदाबी पठाण नाचणगाव, अंजना कामठे आगरगाव, लहनाबाई येवते शेंदरी, प्रमिला सरोडे नाचणगाव, मंगला कपट सोनोरा, कांता नारनवरे विजयगोपाल, इंदु कपट सोनोरा (ढोक) व गंगाबाई पचारे दहेगाव (धांदे) या ग्रामीण भागातील महिलांना उज ज्वला गॅस कनेक्शन योजने अंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले.मान्यवरांचे स्वागत ईशा गॅस एजेन्सीचे संचालक राजीव बतरा यांनी केले. कार्यक्रमाला एल.पी.जी. गॅसचे चंद्रपूर येथील व्यवस्थापक सिताराम गुप्ता, विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:38 PM
ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत.
ठळक मुद्देरामदास तडस : उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वाटप