वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे २३ जूनपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. २४ जून रोजी शनिवार ते सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देणार आहेत.
राज्यपाल पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट वर्धा जिल्ह्याला आहे. दुपारी ३:३० वाजता ते सेवाग्राम येथे दाखल होणार असून, त्यानंतर ते सेवाग्राम आश्रमाला भेट देतील. ४:३० वाजेपर्यंत ते सेवाग्रामला राहणार असून यावेळी ते आश्रमाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतील. याशिवाय ६ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही सेवाग्रामला भेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या ५ जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे येणार आहे. त्यानंतर त्या वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला भेट देतील व सेवाग्राम आश्रमालाही भेट देतील, याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी संदर्भात बैठक पार पडली.