शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

बांधकाम परवानगी देण्यास ग्रामपंचायत सक्षम

By admin | Published: April 10, 2015 1:43 AM

प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांना त्यांच्या ले-आऊटमधील बांधकामाच्या परवनगीचा अर्ज व बांधकामाला मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास नालवाडी ग्रामपंचायत सक्षम आहे.

वर्धा : प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांना त्यांच्या ले-आऊटमधील बांधकामाच्या परवनगीचा अर्ज व बांधकामाला मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास नालवाडी ग्रामपंचायत सक्षम आहे. सदर प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिलेल्या एका निर्देशावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील बांधकामांवर मागील सुमारे तीन वर्षांपासून बंदी असल्याचे भासवून त्यावर लोकप्रतिनिधी आपली राजकीय पोळी शेकत आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील बांधकामाचा मार्ग सुकर झाला, असे फलकही शहरात झळकले; मात्र नागपूर खंडपीठाच्या उपरोक्त आदेशानुसार बांधकामाचा अधिकार नालवाडी ग्रामपंचातीला असल्याचे दिसून येते. यावरुन इतरही १० ग्रामपंचायतींमध्ये याच धर्तीवर बांधकामाला परवानगी देण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीलाच असल्याचे नाकारता येत नाही. ही बाब आपल्या भुखंडावर घराचे स्वप्न बाळगून असणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते. प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांचे स्वत:च्या जागेवरील अकृषक ले-आऊट नालवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बॅचलर रोडला लागून आहे. त्या ले-आऊटमधील भुखंडावरील बांधकामाकरिता सक्षम आर्किटेक यांनी काढलेले नकाशे व मंजुरीचा प्रस्ताव मुरारका यांनी ग्रामपंचायत नालवाडी येथे १ आॅगस्ट २०१३ आणि १४ फेब्रुवारी २०१४ रोजी सचिवाकडे सादर केला होता. त्यावर सचिवाने मुरारका यांना दिलेल्या पत्रानुसार नालवाडी ग्रामपंचायत बांधकामास मंजुरी देण्यास सक्षम नसल्याचे म्हटले होते. परिणामी मुरारका यांचा प्रस्ताव कोणताही निर्णय न घेता विचाराधिन ठेवण्यात आला. गटविकास अधिकारी यांनीसुद्धा वेळोवेळी अर्ज देऊनसुद्धा त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. या विषयी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगर रचनाकार यांनीही अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही. उल्लखेनीय, नालवाडी ग्रामपंचायतीकडे बांधकामाच्या मंजुरीचे असंख्य प्रस्ताव आजही कार्यवाहीविना केवळ विचाराधिन आहेत. ग्रामपंचायत याबाबत निर्णय घेण्यास सक्षम नाही, असे कारण पुढे करण्यात येत आहे. यावरुन मुरारका यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सचिव ग्रामपंचायत नालवाडी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्या. वासंती नाईक व ए. एम. बडर यांच्या न्यायालयाने याबाबत नालवाडी ग्रामपंचायत बांधकामाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे निर्देश सोमवारी दिले. तसेच मुरारका यांनी दाखल केलेल्या बांधकाम प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घ्यावा, असेही निर्देशीत केले आहे, अशी माहिती मुरारका यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने कायदा पारीत केल्यानंतरही ग्रामपंचायत नालवाडी तसेच शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या बांधकाम मंजुरीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेण्याचे आडमुठे धोरण स्वीकारले आहे. न्यायालयाच्या उपरोक्त निर्णयाने ही बाब आता स्पष्ट झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)