आॅनलाईन लोकमततळेगाव (श्यामजीपंत) : गावाच्या विकासासाठी येथील ग्रा.पं. सदस्यांनी बसस्थानक परिसरातील महामार्गालगत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सर्व पक्षीय आहे.तळेगाव हे नागपूर अमरावती या राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वपुर्ण गाव आहे. येथूनच दिल्ली, चेन्नई तसेच मुंबई, कलकत्ता हे महत्त्वाचे महामार्ग जातात. त्यामुळे नागपूर रेल्वेप्रमाणे या रस्तामार्गाचे महत्त्व या गावाला आहे. परंतु विकासाच्या दृष्टिने वरिष्ठ पातळीवर कुठलीही दखल घेतली नसल्याचे येथील प्राथमिक सुविधांच्या अभावावरुन दिसून येते. अप्पर वर्धा धरण हे अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सिमेवर सिंभोरा येथे सुमारे पंचेवीस वर्षांपुर्वी झाले. या धरणाच्या बाधीत क्षेत्रातील अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी शिरी, नांदोरा, गवळा, अशा अनेक मोठ्या लोकसंख्येतील गावातील नागरिकांना येथे पुनर्वसीत करण्यात आले. सुरुवातीला पाच हजार लोकसंख्या वाटणारे हे गाव आज पंचवीस हजाराच्या घरात आहे. परंतु प्राथमिक सुविधांची उपेक्षा झालेली आहे. केवळ मंडी स्वास्थ उपकेंद्राचे भरवश्यावर येथील नागरिकांचे आरोग्य किंवा तत्सम सोयी अवलंबून आहे.येथे तीन वर्षांपूर्वी पोलीस ठाणे अस्तित्वात आले. त्यालाही स्वतंत्र जागा नाही. दारीवारीमध्ये ते आपला कार्यभार सांभाळतात. परिसरात पडीक जमीन भरपूर प्रमाणात आहे. परंतु वनविभाग त्याच्यावर आपला हक्क सांगतात. प्रवाशांच्या सोयीकरिता महामार्गावर मोकळ्या जागेत बसस्थानक आहे. एखादा अपघात घडला तर जखमीला येथून १२ किलो मिटर अंतरावरील आर्वी येथे पाठविल्या जाते. यादरम्यान गंभीर जखमींच्या जीवावर बेतले हे कटू सत्य आहे. प्रवाशांचे दुर्देव आहे. गावातील अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, नाली बांधकाम नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.नवीन वसाहतीमध्ये मुलभूत सुविधांचा अभाव त्याचप्रमाणे शेतकºयांच्या दृष्टीने बोंडअळीच्या प्रभावाने हतबल झालेला शेतकरी त्यांना शासकीय मदत मिळावी अशा एक ना अनेक समस्या मार्गी काढण्याकरिता ग्रा.पं.चे उपसरपंच वहिदखा पठाण, मनीषा गाडगे, सुनील मोहेकर, नंदकिशोर जाधव, प्रशांत कडू, अंकुश नरांगे, राहुल गाडपिले यांनी उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:30 PM
गावाच्या विकासासाठी येथील ग्रा.पं. सदस्यांनी बसस्थानक परिसरातील महामार्गालगत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सर्व पक्षीय आहे.
ठळक मुद्देगावाच्या विकासाकरिता सर्व पक्ष एकत्र : विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी