लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच शेतकरी बांधव समाधानाने जगेल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता या तंत्रज्ञानाच्या युगात संजीवनी बुटी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंताचे प्रचारक वसंतराव ढवळे यांनी केले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २१ दिवस ग्रामगीता संगीत प्रवचनाचे आयोजन केले होते. तीन आठवडे चाललेल्या प्रवचनात संपूर्ण ग्रामगीता वाचन करून उद्बोधन करण्यात आले. येथील गयामाय देवस्थानात आयोजित कार्यक्रमाला शेतकरी महिला, पुरूष उपस्थित होते.या कार्यक्रमात राष्ट्रसंतांचे चरित्र, ग्रामगीता, चिंतनातून महाराजांचे अमृततुल्य विचार शेतकºयांना ऐकवण्यात आले. गुरुवारी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. ग्रामसंघटनेच्या दृष्टीने सामुदायिक प्रार्थनेच महत्व सांगण्यात आले. सप्ताहात रामधून काढण्यात आली. ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्य यावर शेतकºयांना माहिती देण्यात आली.पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, समाज सुस्थितीत नांदावा सर्वांनी मिळून स्वर्गतुल्य सुख निर्माण करावे. सर्वांगिक विकास व्हावा, संस्कृती व एकोपा कायम ठेवून मोबाईलच्या लोच्यात न पडता माणूस आणि माणुसकी याची सांगड घाला. शेतकरी सुद्धा माणूस आहे. जबाबदारी, नैतिक कर्तव्य, समजून जो वागतो त्याला धर्म म्हणतात. परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनिती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव, हाच खरा धर्म होय, राष्ट्रसंताचे साहित्य व विचार शेवटच्या लोकांपर्र्यंत पोहचविणे हाच खरा आर्त संदेश होय. या ग्रंथांचा विचार घरोघरी पोहचवावा असे आवाहन केले.समारोपीय कार्र्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद बुरंगे, दामोधर भोपने, यशवंत लाडवीकर, देविदास सिसट, दिलीप पोकळे हे उपस्थित होते. यावेळी विठ्ठल कांदे, आशिष मोहोड, रोशन काकपुरे यांचा साहित्य दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुभाष लोहे, विठ्ठल कांदे, वसंत जवळेकर यांनी राष्ट्रसंत विचारावर निरूपण केले.श्रावण विजेकर, रामभाऊ दारोकर यांनी टाळ मृदुंगांची साथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकºयांना दिली शपथया कार्यक्रमात गुरूदेव भक्तांच्या उपस्थितीत शेतकºयांना सेंद्रीय शेती करून प्रत्येकाने गाय, बैल हे प्राणी पाळावे, अशी शपथ देण्यात आली. शेती विकसीत करण्यासाठी जनावरांचे खत, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, चारा संकलन केंद्र, गांडूळ खत युनिट तयार करण्याची माहिती दिली.