शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

‘तो’ ग्रामसचिव अखेर पोलिसांच्या हाती

By admin | Published: June 29, 2016 2:01 AM

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीत बांधकामाची परवानगी देणे बंद असताना बोरगाव (मेघे) ग्राम पंचायतीचे सचिव विलास हिरामण रंगारी यांनी ....

न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलावर्धा : शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीत बांधकामाची परवानगी देणे बंद असताना बोरगाव (मेघे) ग्राम पंचायतीचे सचिव विलास हिरामण रंगारी यांनी आर्थिक व्यवहार करून परवानगी दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यावरून सावंगी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातून बचावाकरिता रंगारी याने वर्धा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता दाखल केलेली याचिका रद्द करण्यात आल्याने त्याला सोमवारी अटक करण्यात आली. येथील प्रमोद मुरारका यांनी बांधकाम परवानगीकरिता ग्रामपंचायत नालवाडी येथे सन २०१३ मध्ये अर्ज केला होता. सदर ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रंगारी यांनी त्यांना बांधकाम परवानगी नाकारली. यामुळे मुरारका यांनी माहितीच्या अधिकारात वर्धा शहरालगत अकरा ग्रामपंचायतीत माहिती अधिकारान्वये माहिती मागविली असता ग्रामपंचायती मार्फत जुन्या तारखेस बांधकाम परवानगी दिल्याचे आढळून आले. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार आढळून आल्याने तक्रारदाराची व शासनाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बोरगाव (मेघे) येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी केला. गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता नमूद ११ ग्रामपंचायतीत बांधकाम परवानगी देताना मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक समोर आल्याचे पोलिसांनी कळविले.