पत्रकार परिषद : ग्रंथदिंडीने होणार प्रारंभवर्धा : मराठी भाषा विभाग, म.रा. साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, ग्रंथालय अधिकारी कार्यालय तथा जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव २०१६ २७ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजित आहे. परिसंवाद, व्याख्यान, प्रबोधनपर कार्यक्रम, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व भरगच्च पुस्तकांची रेलचेल आदींनी हा ग्रंथोत्सव रंगणार असल्याचे जिल्हा ग्रंथालयात शनिवारी आयोजित पत्र परिषदेत सांगण्यात आले.सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात ग्रंथोत्सव होत आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता गं्रथदिंडीने प्रारंभ होईल. जिल्हा ग्रंथालय ते सार्वजनिक वाचनालय ग्रंथदिंडी निघेल. उद्घाटनाला खा. रामदास तडस, ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी, प्रदीप बजाज, जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, आ. रणजीत कांबळे, आ.डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. नागो गाणार, आ. अनिल सोले, आ. मितेश भांगडिया, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, समाज कल्याण सहआयुक्त बाबा देशमुख, माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित राहतील. बुधवारी दुपारी डॉ. दीपक पुनसे यांच्या अध्यक्षतेत व तहसीलदार राहुल सारंग यांच्या आतिथ्यात प्रभावी वाचन माध्यमे हा परिसंवाद आहे. सायंकाळी कोमल मून ‘मी सावित्री बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. सायंकाळी कवी संमेलन आहे. स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकासावर जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, लेखाधिकारी प्रतापराय मासाळ, प्रा. मून, प्रा. देशपांडे मार्गदर्शन करतील. सायंकाळी सत्यपाल महाराज प्रबोधन करतील. शुक्रवारी साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप होईल, असेही सांगितले. यावेळी अस्मिता मंडपे, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
साहित्यिक परिसंवादाने रंगणार ग्रंथोत्सव
By admin | Published: January 24, 2016 1:54 AM