शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

गोठ्याच्या तळघरातच गावठी दारूचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:00 AM

राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते.

ठळक मुद्देरामपुरी येथील प्रकार : १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/ वायगाव (नि.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. परंतु, ही दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. याच पार्श्वभूमीवर एका दारूविक्रेत्याकडून चक्क शेतातील गोठ्यात तळघर तयार करून तेथे गावठी दारू गाळली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूसाठ्यासह एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र, होणाऱ्या या कारवाईचाही धाक दारू माफियांना नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वर्धा शहरापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या वायगाव (नि.) येथील सुमेध नगराळे (३४) याने त्याच्या रामपुरी भागातील शेतातील गोठ्यात तळ घर तयार केले. शिवाय याच तळ घरात तो गावठी दारू गाळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने छापा टाकून सुमेध नगराळे याला ताब्यात घेत गोठ्याची बारकाईने पाहणी केली असता तळघरात मोठ्या प्रमाणात कच्चा मोहरसायन सडवा आणि गावठी दारू आढळून आली.तळघराबाबत कुणालाही संशय येऊ नये म्हणून तळघरात जाण्यासाठीच्या मार्गावर आरोपीने कापसाचे गाठोडे ठेवले होते. पोलिसांनी तळघरातून १५ ड्रम मधील कच्चा मोह रसायन सडवा तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, विकास अवचट, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, नितीन इटकरे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी