गिरड : जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या आणि पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गिरड हे गाव सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. टेकडीवरील सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. तसेच दारूचा महापूर आणि रस्त्याची दैना यामुळे नागरिक वैतागले आहे. समुद्रपूर राज्य मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण करून मार्गावर डांबरीकरण सुरू आहे. परंतु या रोडच्या बांधकामात डांबर अत्यल्प प्रमाणात वापरण्यात येत असल्याने लवकरच गिट्टी उखडून रोडवर खड्डे पडण्याची शक्यता व्यक्त आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी या रोडच्या डांबरीकरणाकडे लक्ष द्यावे तसेच कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला समज देऊन डांबरीकरण शासकीय नियमाप्रमाणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या आधीही या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीतच डांबर उखडून खड्डे पडल्याने आताही तशीच स्थिती होते की काय असा प्रश्न प्रवाशांना तसेच गिरडवासियांना पडला असून नागरिक यावर नाराजी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर) टेकडीवरील सौंदर्यीकरण निकृष्ट दर्जाचेगिरड टेकडीवर शासकीय निधीतून सौंदर्यीकरणांचे काम सुरू असून तेथे रस्त्याच्या कडेला गट्टू टाईल्स लावण्यात येणार आहे. परंतु या टाईल्स ईस्टिमेट नुसार लावल्या जात नसल्याची ओरड येथील नागरिक तसेच पर्यटक करीत आहे. काही ठिकाणच्या टाईल्स काम पूर्ण होण्यअगोदरच उखडल्या जात आहे. त्यामुळे सदर कामे केवळ औपचारिकता म्हणून सुरू आसल्याची ओरड पर्यटकांमधून केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कार्यवाई करावी अशीर मागणी ग्रामस्थ तसेच पर्यटकांमधून केली जात आहे.
गिरडवासी समस्यांनी ग्रस्त
By admin | Published: April 19, 2015 1:55 AM