शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

गिरड झाले ‘अ‍ॅग्रोहब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:02 AM

वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

ठळक मुद्देमगन संग्रहालय समितीचा उपक्रम : शेतकऱ्यांना मिळाला आधार

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. बदलती शेती पध्दती, बिज संवर्धन, शेती निविष्ठा निर्मिती शेतीच्या एकूण वाढत्या उत्पादन खर्चावर मात करण्यासाठी बीज संवर्धन, विविध निविष्ठांची निर्मिती, वापर आणि याबद्दल शेतकºयांत जागृती, प्रचार-प्रसार या केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेती चळवळ उभारण्यात आली आहे.सध्या गिरड हे शेतकºयासाठी अ‍ॅग्रोहब म्हणून ओळखले जात आहे. या माध्यमातून शेतकºयासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.शेती अवजारे तयार करणारे वर्कशॉपया केंद्रातर्गत संलग्न शेतकऱ्यांना मनुष्य चलीत छोट्या छोट्या औजारांची निर्मिती करण्यात येते. यात खुरपणी यंत्र, दतार, पंजा, डौरा आदी औजार १५० ते २०० रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतात. शिवाय केंद्र परिसरातील गावात मोबाईल वेल्डिंग वर्कशॉपची सुविधा शेतकºयांच्या मागणी नुसार दिली जाते.विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपारिक घानी बंद पाडणे हे शासनाचे षडयंत्रच आहे. शासनाकडून पारंपारिक घानीला प्रोत्साहन देणाºया कुठल्याच योजना नसल्या तरी तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा आत्मा आहे.डॉ.विभा गुप्ता, अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा२ हजार २५० शेतकरी व ४ हजार महिलांचा सहभागगिरड येथील नैसर्गिक शेती विकास केंद्र सन २००५ मध्ये स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून समुद्रपुर तालुक्यातील शेकडो गावात नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार, प्रात्यक्षिके, महिला बचत गट समुह, शेतकरी मंडळाची उभारणी करण्यात आली. यात ६० मंडळात २२५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तर २२६ महिला बचत गटाच्या फळीत ४००० महिलांचा सहभाग आहे. या केंद्रावरुन सहभागी नागरिकांना ग्राम स्वच्छता व आरोग्य, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, देशज बीज संवर्धन अभियान, नैसर्गिक शेती अभियान, स्वदेशी चळवळ, तेल स्वराज आदी उपक्रमातून जोडण्यात आले आहे.कापूस ते कपडा उत्पादनकापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगापर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टर मध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहे. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.सहा गोमूत्र संकलन केंद्राची निर्मितीनैसर्गिक निविष्ठांसाठी लागणारे गोमूत्राची पूर्तता करण्यासाठी ६ गोमूत्र संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील शिवणफळ, वानरचुहा, साखरा आर्वी, गिरड, भवानपूर येथे गोमूत्र संकलन केंंद्र उभारण्यात आले. या गोमूत्र केंद्रावरुन शेतकरी गोमूत्राची खरेदी करुन निविष्ठांसाठी वापर करतात.तेल स्वराज्य अभियानातून जवसाचे क्षेत्र वाढले.मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपारिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात १०५ शेतकºयांचा सहभाग आहे. या शेतकºयांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे. सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करुन तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपारिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समुहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे.आमची शेती शाळा उपक्रममगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात आमची शेती शाळा हा उपक्रम राबविल्या जातो. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक जीवन, बदलती आधुनिक शेती पध्दती, ग्रामीण आरोग्य, नैसर्गिक शेती या विविध विषयावर दर महिन्याला शेतकºयांची शाळा भरल्या जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती