हिंगणघाट : येथील वणा नदीच्या पात्रातून अनधिकृतपणे पाणी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तहसीलदारांनी शुक्रवारी तर वनविभागाच्यावतीने शनिवारी कारवाई करीत खोदकाम करण्याकरिता आणण्यात आलेली क्रेन व इतर साहित्य जप्त केले. सदर खोदकाम येथील नदीतील पाणी भूगाव येथील कंपनीला पाणी पुरविण्याकरिता नेण्यात येत असल्याचे या तहसीलदारांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. जप्त केलेले साहित्य तहसील व वनविभागाच्या कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आले आहे. सदर काम सुरू करण्याकरिता या खासगी कंपनीला बांधकाम विभागाच्यावतीने परवानगी देण्यात आल्याचे पत्र त्यांच्याकडे असल्याचे समोर आले आहे. या नदीतील पाणी वर्धेतील उद्योगाला पळविल्याने स्थानिक उद्योगांना पाण्याची कमतरता जाईल असा आरोप येथील नगरविकास सुधार समितीने केली आहे.
वणाचे पाणी भूगावला पळविण्याचा घाट
By admin | Published: April 12, 2015 1:59 AM